Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान त्याच्या अनोख्या शैलीसाठी ओळखला जातो. सैफ फार कमी बोलत असला तरी तो जेव्हा बोलतो तेव्हा मात्र समोरच्यांची बोलती बंद करतो. असं असलं तरी सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. व्हिडिओ पाहून सैफ अली खानचा हिंदू धर्मावर विश्वास नसल्याचं बोललं जात आहे.(Bollywood, Actor, Saif Ali Khan, Hinduism)
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सैफ आणि करिना कपूर त्यांच्या नवीन कारचे स्वागत करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नवीन गाडीसमोर नारळ फोडताना दिसत आहे. यावर आता सोशल मीडिया यूजर्स प्रश्न उपस्थित करत आहेत.
हिंदू धर्मानुसार, घरातील मुख्य सदस्य नवीन गाडी समोर नारळ फोडतो. सैफ किंवा करिनाने त्यांच्या नवीन गाडी समोर नारळ फोडणं अपेक्षित होतं मात्र सैफने स्वतः नारळ फोडला नाही आणि त्याच्या मुलालाही तसं करू दिल नाही. त्यामुळे सोशल मीडियावर युजर्स असा सवाल करत आहेत की त्याचा हिंदू धर्मावर विश्वास नाही का?
दरम्यान, याआधीही सैफ अली खानची अशी अनेक विधानं समोर आली आहेत, ज्यावर सोशल मीडिया युझर्सनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अलीकडेच सैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या जुन्या व्हिडिओमध्ये सैफ म्हणतोय की तो आपल्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही.
https://twitter.com/SS92765750/status/1574648851679842304?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1574648851679842304%7Ctwgr%5Eb0dc31ff6b79ed6770c8296fc5d9e5e1db20a19d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fentertainment%2Fentertainment-news%2Fbollywood-news%2Fsaif-ali-khan-video-viral-of-hindu-rituals%2Farticleshow%2F94763224.cms
‘मी माझ्या मुलाचे नाव अलेक्झांडर ठेवू शकत नाही आणि तसंच त्याचं नाव रामही ठेवू शकत नाही. मी एखादं चांंगलं मुस्लिम नाव का नाही ठेवू शकत?’ दरम्यान, सध्या सैफ अली खान त्याच्या ‘आदिपुरुष’ सिनेमातील रावणाच्या लुकमुळे चर्चेत आला आहे.
त्याच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. तो रावण कमी आणि खिलजी जास्त दिसतो असंच अनेकांचं म्हणणं आहे. आदिपुरुषचा वाद न्यायालयात गेला असून अनेकांनी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दरम्यान, १२ जानेवारी २०२३ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Saif Ali Khan: सैफ अली खानचे आजोबा होते ‘या’ राज्याचे शेवटचे नवाब, नंतर तेच राज्य झाले भारतात विलीन
Saif Ali Khan: ‘मुलाचं नाव राम नाही ठेवू शकत’, सैफ अली खानचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, केली ‘ही’ मागणी
Saif Ali Khan: ५००० कोटींच्या संपत्तीतील एक कवडीही मुलांना देणार नाही सैफ अली खान, ‘हे’ आहे कारण