अमृताशी घटस्फोट घेऊन, करीनासोबत लग्न करण्याचे खरं कारण… सैफ अली खानने केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या मोहक लूक आणि घायाळ अदांसाठी नेहमीच चर्चेत असते. सैफ अली खान आणि करीना कपूर दोघांचीही चांगली जोडी मानली जाते आणि त्यांना बी-टाऊनमध्ये स्टायलिश कपल म्हटले जाते.

पण सैफने या आधी अभिनेत्री अमृता सिंगशी विवाह केला होता. सैफने अमृताला घटस्फोट का दिला आणि करीनाशी लग्न का केले? त्याचे कारण आता समोर आले आहे.

एका मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला की, “मला एका हॉट आणि सुंदर मुलीशी लग्न करायला आवडेल. हा हे असलं पाहिजे. विनोदी, सुंदर आणि कोणत्या ही गोष्टीवरून आपल्याला जज करणारी नसली पाहिजे. या तीन गोष्टी असणं महत्त्वाचं आहे.”

सैफ पुढे म्हणाला, “लग्न केल्यानंतर दुसऱ्या स्त्रीकडे बघून तिला हॉट बोलणं चुकीचं आहे. त्यामुळे पत्नी हॉट आणि सुंदर असली पाहिजे. माझे सुंदर मुलीशी लग्न व्हायला पाहिजे होते अशी माझी इच्छा आहे.”

अमृता आणि सैफ अली खान दोघांमध्ये १३ वर्षांचा फरक होता. तर सैफने एकदा सांगितले होते की, “अमृता त्याला नेहमी जज करायची.” सैफने १९९१ मध्ये अमृता सिंगसोबत लग्न केले होते. ‘बेखुडी’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली. सैफ आणि काजोल आधी त्या चित्रपटात काम करत होते, पण चित्रपटाच्या दिग्दर्शकाने नंतर सैफला चित्रपटातून काढून टाकले.

सैफ कदाचित चित्रपटात नसेल, पण त्याच्या सेटवर त्याला अमृताच्या रूपात एक जीवनसाथी मिळाला होती. अमृताला भेटल्यानंतर काही महिन्यांनीच सैफने तिच्याशी लग्न केले. मात्र 2004 मध्ये दोघे वेगळे झाले. सैफला अमृताला दोन मुले आहेत – इब्राहिम आणि सारा अली खान.

 

महत्वाच्या बातम्या
चालू किर्तनातच मुस्लिम किर्तनकार ताजूद्दीन महाराजांनी सोडला प्राण; पहा ह्रदय हेलावनारा व्हिडीओ
बिगबाॅसच्या घरात दिसणार ‘हे’ चार नवीन स्पर्धक! नावे वाचून चकीत व्हाल
सिंधू नदी पुन्हा भारताचा भाग बनेल, अरबी समुद्राला सिंधूसागर हेच नाव योग्य- भगतसिंग कोश्यारी
राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ हे शिवसेना सोडून गेले तरी काही फरक पडला नाही; ते भस्मासुरच’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.