नवाब सैफ देखील बायकोसमोर आहे भीगी बिल्ली; मिडीयासमोर मागितली होती बायकोची माफी

असे म्हणतात बायकोसमोर नेहमी नवऱ्यालाच माफी मागावी लागते. नवरा बायकोच्या भांडणामध्ये चुक कोणाचीही का असेना माफी मात्र बायकोलाच मागावी लागते.

पटतय ना मंडळी पटणारच ना. कारण ही गोष्ट खरी आहे. अनेक वेळा चुक बायकोची असून देखील नवरा सॉरी बोलतो आणि नवरा बायकोमध्ये जर एखाद्या तिसऱ्या मुलीची एन्ट्री झाली. तर मग तर नवऱ्याची खैर नाही.

या गोष्टीला फक्त सामान्य माणसे अपवाद नाहीत. तर बॉलीवूड स्टार्स देखील हेच करतात. हो हे खरे हा किस्सा आहे अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहीली पत्नी अमृता सिंगचा

सैफ आणि अमृताचा २००४ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर सैफने २०१२ मध्ये करिना कपूरसोबत लग्न केले. त्यांना तैमूर हा मुलगा देखील झाला.

पण ऐककाळ असा देखील होता. जेव्हा सैफ अमृताच्या प्रेमात पागल झाला होता. त्यामूळे आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असणार्या अमृतासोबत त्याने लग्न केले.

१९९२ साली ‘परंपरा’ या चित्रपटातून सैफने आपल्या अभिनय कारकिदीर्ची सुरूवात केली. ‘परंपरा’ सुपरहिट झाला. यानंतर आशिक आवारा, पहचान, इम्तिहान, ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी असे अनेक चित्रपट त्याने केले.

‘मैं खिलाडी तू अनाडी’ हा सैफ आणि अक्षय कुमारचा सुपरहिट चित्रपट आहे. पण या चित्रपटाच्या प्रीमीयरला खुप मोठा तमाशा झाला होता. त्यामूळ सैफला मिडीयासमोर पत्नी अमृताची माफी मागावी लागली होती.

‘मैं खिलाडी तू अनाडी’ चित्रपटाच्या प्रीमीयरला सैफ पत्नी अमृतासोबत गेला होता. या चित्रपटाच्या प्रीमीयरला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. तिथे सैफ अली खानच्या अनेक फिमेल फॅन्स उपस्थित होत्या.

या फॅन्समधील एक फिमेल फॅन सैफ अली खानकडे आली. ती थोडा वेळ त्याच्याशी बोलत होती. त्यानंतर त्या मुलीने सैफसोबत डान्स करण्याची इच्छा जाहीर केली.

ही गोष्ट अमृताला मान्य नव्हती. पण त्या मुलीचे मन राखण्यासाठी सैफ तिच्यासोबच डान्स करायला सुरुवात केली. त्या दोघांना एकत्र डान्स करताना पाहून अमृताला खुप जळण झाली.

त्या मुलीसोबत तिचा बॉयफ्रेंड देखील आला होता. त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला देखील ही गोष्ट आवडली नाही. त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला सैफ आपल्या गर्लफ्रेंडसोबत डान्स करतोय ही गोष्ट आवडली नाही.

सैफ आपल्या गर्लफ्रेन्डसोबत डान्स करतोय हे पाहून तो भडकला. यावरून भांडण झाले आणि संतापलेल्या त्या बॉयफ्रेन्डने सैफला जोरदार बुक्का मारला होता.

प्रीमिअरस्थळी धडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. अर्थात सैफने पोलिसांकडे न जाता. हे प्रकरण तिथेच संपवले होते. पण हे सगळे बघून अमृता चिडली आणि तिथून रागात घरी जायला निघाली.

आपले हे वागणे अमृताला अजिबात आवडलेले नव्हती. या गोष्टीची जाणीव सैफला झाली होती. यानंतर सैफने कॅमेऱ्यासमोर अमृताची माफी मागितली होती.

यापुढे कधीही अशी चुक करणार नाही, असे वचन त्याने अमृताला दिले होते. अमृताचा राग कमी करण्यासाठी सैफने त्यावेळी अनेक प्रयत्न केले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.