सैफ पाच हजार कोटींचा मालक, मात्र तैमूरला व त्याच्या भावाला कवडीही मिळणार नाही; कारण..

मुंबई | नुकतेच पतौडी खानदानात अजून एका वारसदाराचे आगमन झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. तर सैफ चौथ्यांदा बाबा झाला आहे. परंतु मध्य प्रदेशातील ५००० कोटी रुपयांच्या संपत्तीवर तैमुर किंवा नवा पाहुण्याचा हक्क नाही. यामागे खुप मोठा आणि जुना वाद आहे.

करीनाने रविवारी सकाळी एका मुलाला जन्म दिला आहे. तैमुरला मोठा भाऊ आला. मात्र यानंतर सोशल मीडियावर सैफच्या संपत्तीचे नेटकऱ्यांनी वाटप सुरु केले आहे. याबाबतच्या मीम्सचा सोशल मीडियावर पाऊसच पडला आहे. परंतु खरी परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे.

नवाब असलेल्या सैफला वडिलोपार्जित संपत्ती मध्य प्रदेशसह हरियाणा, दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये असलेल्या ५००० कोटींपेक्षा अधिक संपत्तीचा वाद सुरू आहे. हा वाद सैफचे पणजोबा हमीदुल्ला खान यांच्या स्थावर व जंगम संपत्तीवरून सुरू आहे.

नवाब पतौडीची संपत्ती खुप पुर्वीपासून वादात आहे. भोपाळ येथील त्यांची जमीन गृह मंत्रालयाच्या शत्रू संपत्ती विभाग संपत्तीचा मालकी हक्क कोणाचा याचा तपास करत आहे. भोपालचे नवाब हमीदुल्ला खान यांनी संपत्तीचा वारसा हक्क आपली मोठी मुलगी आबिदा हिला दिला होता.

हमीदुल्ला यांनी हक्क दिलेली मुलगी आबिदा नंतर पाकिस्तानात गेली. यामुळे या संपत्तीवर दुसरी मुलगी सुल्तानच्या कुटंबाचा हक्क आला. सैफ अली हा त्यांचा नातू आहे.

यावर कायदेशीर लढाई अद्याप सुरूच आहे. नवाब पतौडी यांच्या निधनानंतर संपत्तीची मालकी हक्क शर्मिला टागोर आहे. त्यांची लहान मुलगी सबा अली फॅशन डिजायनर आहे. ती या संपत्तीची  देखरेख करते. नवाब यांची भोपाळ, रायसेन, सीहोर जिल्ह्यात शेकडो एकर जमीन आहे.

या हजारो कोटींच्या संपत्तीला वारसदार कोण हा मोठा प्रश्न आहे. करीनाचा मोठा मुलगा तैमूर आणि नवा पाहूणा याचे वासरदार होतीलच यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
करिना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
आपल्या घटस्फोटाबद्दल मुलांना सांगायला घाबरत होता सैफ अली खान; म्हणून त्याने…
बाबो! ‘या’ अभिनेत्रीला करायचे आहे तैमूर खानशी लग्न; म्हणाली ‘वाट पाहायला तयार आहे’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.