ब्रेकिंग! साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, ‘या’ आमदाराची झाली निवड

शिर्डी । सर्वांचे लक्ष लागलेल्या शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळांच्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे  आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आले आहे. यामुळे अनेक दिवसांनंतर हा निर्णय लागला आहे.

याबाबत साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.

शिर्डी येथील साई संस्थानचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे आनंद होत आहे. आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर या जागेवर अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली होती. परंतु पहिल्यांदाच आता तरुण नेतृत्वाकडे अध्यक्षपदाचे नेतृत्व देण्यात आले आहे. हे पद अगोदर काँग्रेसकडे असायचे.

परंतु आता काही बदल करण्यात आले आहेत. यंदा शिर्डी संस्थांनचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पंढरपूर देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे. मागील काही दिवसांत ज्या काही घडामोडी शिर्डीमध्ये घडल्या आहेत. यामध्ये लक्ष घालणार आहे. असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

याठिकाणी काही दिवसांपूर्वी पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक नियम देखील घालण्यात आले आहेत. याबाबतीत पुढाकार घेऊन मी देवस्थान ट्रस्ट आणि पत्रकार यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहे. असेही ते म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केला होता. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. शिर्डीसाठी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु होती. अखेर आज हा निर्णय झाला आहे.

ताज्या बातम्या

नागपुरमध्ये मित्राने केली फिल्मी स्टाईलमध्ये तरुणाची हत्या; हत्येचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल

बाबो! भंगारवाल्याने चक्क खरेदी केले 3 हेलिकॉप्टर, तब्बल एवढी चुकवली किंमत

काय सांगता! एलियनने केलं चक्क तरुणीचं अपहरण, त्यानंतर जे झालं ते तुम्हीच वाचा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.