मुंबई | मराठीतील लोकप्रिय मराठी शो ‘बिग बॉस’ मराठी या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सई लोकूर अखेर विवाहबंधनात अडकली आहे. तीर्थदीप रॉयसह तिने लग्नगाठ बांधली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळचे मित्रमंडळी आणि कुटंबीय यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. सईने मराठी आणि बंगाली दोन्ही पद्धतीने लग्न केलं आहे. वधूच्या वेशात सई अतिशय सुंदर दिसत होती.
सोमवारी सकाळी ९.५४ वाजता सई आणि तिर्थदीप यांचा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. याचबरोबर २९ नोव्हेंबर रोजी सई-तिर्थदीप यांच्या लग्नाचं देवकार्य पार पडले होते. सईने त्याचेदेखील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
तसेच सईने लग्नापूर्वीच्या अनेक विधींचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे तिच्या विवाहाचे फोटो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. बिग बॉसनंतर सई मालिका किंवा चित्रपटात दिसली नसली नाही. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात होती.
दरम्यान, २ ऑक्टोबर २०२०२ रोजी सई व तीर्थदीप यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळीही सईने तिर्थदीपसाठी खास पोस्ट शेअर केली होती. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे, असं कॅप्शन सईने दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; घरात एकाच वेळी डबल धमाका
‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन
साराचा कि.सींग सिन पाहून वडील सैफ अली खानने दिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाला…