लग्नाआधीच सुरू झाला रोमान्स! माझा होशील ना मधील सई-आदित्यचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

माझा होशील ना ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मिलिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेच्या कथेसोबत मालिकेत नायक आणि नायिका दोघे प्रेक्षकांना आवडत आहेत. यामध्ये आदित्य आणि सई यांची हटके लव्हस्टोरी आहे. लवकरच म्हणजे व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर त्यांच लग्न होणार आहे. पण त्यांच्या लग्नाआधीच ही जोडी रोमान्स करताना दिसत आहे.

माझा होशील ना मालिकेतील सई (गौतमी देशपांडे) आणि आदित्य (विराज कुलकर्णी) यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या लग्नाचा क्षण खूप महत्वाचा असणार आहे. चाहत्यांना १४ फेब्रुवारीला त्यांच लग्न पाहायला मिळेल. परंतु त्यापुर्वीच त्यांच्या लग्नाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/CK86MAsJ60o/?utm_source=ig_web_copy_link

आदित्य आणि सईच्या लग्नाची वाट पाहत असणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडीओ १४ फेब्रुवारीची आणखी उत्सुकता वाढवणारा आहे. सध्याच्या या व्हिडीओमध्ये आदित्या सईला झोका देतो आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी आदित्य आणि सई यांच्या लग्रानाचा प्रोमो दाखवण्यात आला होता. सईचं लग्न सुयशशी ठरले होते. त्यांच्या लग्नाच्या विधीही सुरू झाल्या होत्या. परंतु मालिकेत अचानक काही ट्विस्ट पाहायला मिळाला आणि त्यामुळेच आदित्य आणि सईचं लग्न होणार हे पक्क झालं आहे. पण कधी याचीच उत्सुकता सर्वाना लागली होती. अखेर तो क्षण आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘माझा होशील ना’ मालिकेतील ‘हा’ अभिनेता आहे अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा
‘मला भारतत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा’ रतन टाटांचे भावूक अवाहन
मानसी नाईकने पती प्रदीप रावांसाठी घेतला खास उखाणा; वाचून तुम्हाला वाटेल कौतुक
तुम्ही प्राजक्ता माळीचा हा डान्स पाहिला का? पाहिला तर तुमचेही पाय थिरकतील

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.