मनोज पाटीलच्या आत्महत्येला जबाबदार साहील खानच्या मुसक्या आवळल्या; मनसेने दिली होती धमकी

मुंबई। मिस्टर इंडिया मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर आता मोठी माहिती समोर येत आहे. मनोज पाटील याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आता अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खान याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ओशिवरा पोलिसांनी साहिल खानला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज पाटीलने (काल) गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आत्महत्येपूर्वी मनोज पाटील याने एक सुसाईट नोट देखील लिहिली होती व त्यामध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचं कारण साहिल खान असल्याचे लिहिले आहे.

सुदैवाने मनोजची स्थिती स्थिर असून बुधवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

मनोज पाटील याने लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. मानसिक त्रास आणि बदनामीमुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. व त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र वेळेत उपचार मिळाल्याने मनोजची तब्येत आता स्थिर आहे. मात्र मनोज पाटीलने आत्महत्या केल्यानंतर साहिल खानाने माध्यमांशी संवाद साधला होता. व त्यावेळी त्याने हे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते.

साहिल म्हणाला होता की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मनोज पाटीलने राज फौजदारला 2 लाख रुपयांचे बनावट आणि इक्सापायर स्टेरॉयड विकले होते. साहिलने या गोष्टीचा खुलासा करत स्टेरॉयड विकत घेतल्याच्या पावत्या आणि इंजेक्शन देखील दाखवल्या आहेत. मात्र आता साहिल खानच्या अडचणी वाढ झाली असून त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.