चोराच्या उलट्या बोंबा! साहील खान म्हणतोय की मनोज पाटील नकली स्टेराॅईड विकायचा

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून फिटनेस आयकॉन साहिल खान चर्चेत आला आहे. याचे कारण देखील तसेच आहे. जेव्हा मिस्टर इंडिया मनोज पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये साहिल दोषी असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते.

मनोजच्या नावावर मिस्टर इंडियाचे विजेतेपद आहे. अनेक मोठ्या स्पर्धेत त्याने भाग घेऊन नाव कमवले आहे. आता मनोजने साहिलवर स्वत: ला मानसिक छळ केल्याचा आणि स्वतःला सोशल मीडिया गुंडगिरीचा बळी बनवल्याचा आरोप केला आहे. यामुळे याबाबत तपास सुरू आहे.

यानंतर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या, मनोज पाटीलने केलेल्या आरोपांनंतर साहिल खानने आपली बाजू मांडली आहे. सोबतच साहिल खानने मनोज पाटीलवर अनेक आरोप केले आहेत. यामुळे हे प्रकरण वेगळ्या वळणार गेले आहे.

मनोज पाटीलने राज फौजदारला २ लाख रुपयांचे बनावट आणि इक्सापायर स्टेरॉयड विकले होते, असे साहिलने म्हटले आहे. याबाबत साहिलने स्टेरॉयड विकत घेतल्याच्या पावत्या आणि इंजेक्शन दाखवले आहेत, अशीही माहिती दिली आहे.

याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय साहिल खान हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मनोज पाटील विरोधात पोस्ट केला आहे. ज्यात तो फसवणूक करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामुळे आता पुढे अजून काय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अलीकडे अशा प्रकारे नकली स्टेरॉयड मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. यामुळे आता या प्रकरणाची कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. ही एक मोठी साखळी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.