‘बसपन का प्यार’ सहदेवचं नवीन गाणं व्हायरल, आता नवीन गाणं देखील सोशल मीडियावर घालतय धुमाकूळ

मुंबई। ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिरदो हा चिमुरडा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बचपन का प्यार हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होताच, तो रातोरात स्टार झाला आहे. या गाण्यानं अक्षरशः चाहत्यांना वेड लावलं आहे. अशातच आता सहदेवचं एक नवीन गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या गाण्यानं व सहादेवच्या आवाजानं युजर्सला वेड लावले आहे.

हे गाणं नेटफ्लिक्‍स वरची पॉप्‍युलर सीरीज ‘मनी हाइस्‍ट’ मधील आहे. सहदेव त्यांच्याच शैलीत ‘बेला चाओ बेला चाओ’ गात आहे. आणि ते लोकांना आवडत आहे. युजर्स गाण्यावर खूप कमेंट करत आहेत आणि मित्रांसोबत शेअर करत आहेत. तसेच सहदेवचं प्रचंड कौतुक होत आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सहदेव आपल्या हटके आवाजात हे नवीन गाणं गात आहे . व हे आता गाणं भन्नाट व्हायरल झालं असून या गण्यानंतर देखील सहदेवच प्रचंड कौतुक केलं जातं आहे. या आधीही सहदेव त्यांच्या गाण्यानं प्रचंड प्रसिद्ध झाला होता.

सहदेव इतकं फेमस झाला आहे. की आत्ता अनेक पापाराझी त्याला आपल्या कॅमेरात टिपण्यासाठी त्याच्या मागावर असतात. सहदेव एका गाण्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड फेमस झाला असून त्याने गायलेल्या गाण्यानं सगळ्यांना अक्षरशः वेड लागले आहे.

अगदी सामान्य माणसांपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सर्वच या गाण्याचा ट्रेंड फॉलो करत आहेत. सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल झाल्यानंतर सहदेव रातोरात स्टार झाला आहे. त्यानंतर २७ जुलै रोजी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही सहदेवची भेट घेऊन त्याचं गाणं लाईव्ह ऐकुन त्याचं कौतुक केलं होत.

त्याचप्रमाणे सिंगीग शो इंडीयन आयडलच्या एका एपिसोडमध्ये देखील तो आला होता ज्यात त्याने आपल्या गाण्याने धमाल केली होती. व त्यानंतर त्याने बसपन का प्यार हे गाणं बॉलीवूड गायक बादशहा सोबत नवीन पद्धती बनवलं व ते देखील प्रसिद्ध झालं आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.