६ लाखात येणार भारतातील सगळ्यात सुरक्षित कार, global NCAP कडून मिळाले आहे ५ स्टार रेटींग

भारतात कार खरेदी करताना, जवळजवळ प्रत्येकजण मायलेजकडे बघून गाडी खरेदी करतो. परंतु कारमधील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. मात्र याकडे दुर्लक्ष केले तर ते महागात देखील पडू शकते. यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आता आम्ही कारच्या सुरक्षा वैशिष्ट्यांविषयी आणि त्याच्या सेफ्टी स्टार रेटिंगबद्दल बोलत आहोत. ज्याकडे दुर्लक्ष करणे नेहमीच जड असते. आपण कोणत्याही सेगमेंटची कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, त्या कारच्या सर्व फीचर्सकडे तसेच त्यातील सेफ्टी फीचर्सकडे लक्ष द्या.

ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकता. हॅचबॅक विभागातील टाटा अल्ट्रोज सर्वात जास्त विक्री करणारी कार बनली आहे. या कारने विक्रीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. यामुळे बाजारात देखील या गाडीची क्रेझ आहे.

ही कार केवळ शानदार फीचर्ससच नाही तर त्याच्या सेफ्टी फीचर्समध्ये फ्रंट सीटवर ड्युअल एअरबॅग, एबीएस, ईबीडी, स्पीड वॉर्निंग अलार्म, रियर पार्किंग सेंसरसारखे प्रीमियम फीचर्स आहेत. या कारला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग देण्यात आले आहे.

ही कार ५.७९ लाख रुपये किंमतीसह खरेदी केली जाऊ शकते. यामुळे या सुरक्षित असलेल्या कारची किंमतही जास्त नाही. यामुळे फॅमिली कारसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. इतर सर्व कारच्या तुलनेत ही सुरक्षित कार आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राखी सावंतकडून झाली मोठी चुक, बोलता बोलता सांगितले खतरों के खिलाडीच्या विजेत्याचे नाव

जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती, १०० वर्षांत केले येवढे दान, जाणून घ्या…

Indian Idol 12; ट्रोल होत असलेल्या शण्मुखप्रिया बद्दल जावेद अख्तर यांनी केले धक्कदायक विधान, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.