पत्नीशी असलेल्या प्रेमप्रकरणाच्या संशयावरून साडूने काढला साडूचा काटा

पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून सख्या साडूनेच अवघ्या दिड महिन्यांपुर्वी प्रेमविवाह झालेल्या साडूचा कोयत्याने वार करत खु.न केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शुभम दिपक कुडाळकर (वय.२६. रा. इचलकरंजी) असं खु.न झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी साडू सुरज शामराव कुंभार (वय.२७. रा. कुडचे मळा. इचलकरंजी) याच्यासह संतोष बाडिगीर (वय.२२. रा. कोरोची) आणि संकेत म्हेत्रे (वय.२३. रा. जवाहरनगर. इचलकरंजी) या तिघांना अटक केली आहे.

पोलिस उपअधीक्षक बी.बी. महामुनी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, मृत शुभम आणि आरोपी सुरज कुंभार सख्खे साडू आहेत. सुरजला आपल्या पत्नीसोबत शुभमचे प्रेमप्रकरण असल्याचा संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. अनेकवेळा सुरजने पत्नीला समजावून सांगितले पण त्यांच्यातील प्रेमप्रकरण सुरूच होते. त्यामुळे सुरजने शुभमचा काटा काढायचे ठरवले.

सुरजने त्याच्या दोन मित्रांना हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तिघांनी मिळून मध्यप्राशन केले. त्यानंतर त्यांनी शुभमचा काटा काढण्याचा प्लॅन केला. रात्रीच्या सुमारास त्यांनी शुभमला शहापुर येथे शाळेच्या मैदानावर बोलावून घेतले. तिघांनी मिळून शुभमवर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या शुभमने जागीच प्राण सोडले. त्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी पथकं तैनात करून आरोपीचा शोध घेतला असता त्यांना रांगोळी गावच्या हद्दीत तिघे आरोपी लपून बसले असताना त्यांना ताब्यात घेतले.

पोलिस उपनिरिक्षक प्रकाश निकम, महेश कोरे, सुरेश कोरवी, अमित भोरे, जावेद आंबेकरी, ज्ञानेश्वर बांगर, अर्जून फातले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतातील कोणत्या राज्यात मुली सगळ्यात जास्त उंच असतात? आयएएस मुलाखतीत विचारलेला प्रश्न
मुंबई महापालिका आर्थिक दिवाळखोरीत? पालिकेवर दैनंदिन खर्चासाठी कर्ज काढण्याची वेळ
खुशखबर! वाहनाच्या नव्या पॉलिसीमुळे वाहननिर्मितीला मिळणार चालना

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.