‘NPR, NRC आणले तर ‘दुसरे शाहीनबाग उभे करू’, असदुद्दीन ओवेसींचा सरकारला इशारा

सरकारने एनपीआर (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) आणि एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) कायदे आणल्यास आम्ही अजून एक नवीन ‘शाहीन बाग’ तयार करू, असा इशारा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष ‘असदुद्दीन ओवेसी’ यांनी रविवारी दिला.

दिल्लीतील शाहीन बाग येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दीर्घकाळ निदर्शने करण्यात आली होती, ज्यांनी कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यानंतर माघार घेतली. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसींनी आणखी एक शाहीन बाग बांधण्याचा इशारा दिला.

ओवेसी म्हणाले, “जर त्यांनी एनपीआर, एनआरसी कायदे केले तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि अजून एक शाहीन बाग तयार करु.” मात्र, यासोबतच त्यांनी पीएम मोदींना सीएए मागे घेण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, “मी पीएम मोदी आणि भाजपला कृषी कायद्याप्रमाणे सीएए रद्द करण्याचे आवाहन करतो कारण ते संविधानाच्या विरोधात आहे.”

याशिवाय रामपूरमध्ये आयोजित एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे देशाचे सर्वात मोठे नौटंकी आहेत आणि त्यांनी चुकून राजकारणात प्रवेश केला, अन्यथा चित्रपटसृष्टीतील लोकांचे काय झाले असते, सर्व पुरस्कार तर मोदीजींनीचं  जिंकले असते.”

ते म्हणाले की, तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, “माझ्या तपश्चर्येत कमतरता राहिली,” यावरुन स्पष्टपणे दिसून येते कि, आपल्या देशाचे पंतप्रधान किती मोठे नौटंकीबाज आहेत.

ओवेसी म्हणाले, ‘आंदोलनात ७५० शेतकरी मरण पावले, तरीही त्यांनी आपली जमीन सोडली नाही आणि खंबीरपणे उभे राहिले, यालाच तपस्या म्हणतात आणि तुम्ही (मोदी) म्हणता माझ्या तपश्चर्येत काही कमतरता होती. अहो मोदीजी, तुम्ही स्वतःला हिरो बनवण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आगामी निवडणुका पाहता पंतप्रधान मोदींनी कायदे मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.