मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. राज ठाकरे(Raj Thakare) यांना अयोध्येत प्रवेश दिला जाणार नाही, असे वक्तव्य भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना सूचक इशारा देखील दिला होता.(Sadhvi will show the video of Raj Thackeray apologizing)
आता या मुद्द्यावरून साध्वी कांचनगिरी यांनी एक नवीन दावा केला आहे. उत्तर भारतीयांना झालेल्या त्रासाबद्दल राज ठाकरेंनी खेद व्यक्त केला होता, असे साध्वी कांचनगिरी म्हणाल्या आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत साध्वी कांचनगिरी यांनी हा दावा केला आहे. आपण राज ठाकरेंना माफ केलं असल्याचं देखील साध्वी कांचनगिरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काल दिल्लीत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अयोध्या दौऱ्यावरून ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘उत्तर भारतीयांची माफी मागत नाही, तोपर्यंत राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही’ अशी भूमिका भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत साध्वी कांचनगिरी देखील हजर होत्या. उत्तर भारतीयांना झालेल्या त्रासाबद्दल राज ठाकरेंनी खेद व्यक्त केल्याचे साध्वी कांचनगिरी यांनी सांगितले. साध्वी कांचनगिरी पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, “चार महिन्यांपूर्वी मी राज ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. यानंतर राज ठाकरे यांनी मला बोलावलं. माझ्याशी चर्चा केली. माझा मानसन्मान केला.”
“यावेळी मी राज ठाकरेंना विचारलं की तुम्ही उत्तर भारतीयांसोबत जे केलं ते योग्य होतं का? त्यावर राज ठाकरे यांनी उत्तर दिलं की माताजी आमचं चुकलं आहे. यासंदर्भातला व्हिडिओ मी दाखवते. त्यावेळी सर्व पत्रकार उपस्थित होते. त्यांनी एका संताची माफी मागितली आहे. तर तुम्ही देखील त्यांना माफ करावं”, असे साध्वी कांचनगिरी यांनी पत्रकार परिषदेत ब्रिजभूषण शरण सिंह यांना सांगितले.
साध्वी कांचनगिरी पत्रकार परिषदेत पुढे म्हणाल्या की, “ब्रिजभूषण शरण सिंह तुम्ही फक्त स्टेज तयार ठेवा. राज ठाकरे येऊन आपली चूक मान्य करतील आणि माफी मागतील, याची जबाबदारी माझी असेल”, असे साध्वी कांचनगिरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरेंची भेट घेऊ नये, असं आवाहन भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“ब्रिजभूषण तुम्ही फक्त स्टेज तयार ठेवा, राज ठाकरे येऊन आपली चूक मान्य करतील अन् माफी मागतील”
व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक; बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक
VIDEO: वराच्या मित्रांनी दिले असे गिफ्ट, पाहताच नवरीच्या चेहऱ्याचा उडाला रंग, लाजेने झाली पाणी पाणी