उत्तर प्रदेशातील कानपूर येथे विश्व हिंदू परिषदेने रामोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रत्येक हिंदूने किमान चार मुले जन्माला घातली पाहिजेत, असं विधान साध्वी ऋतंभरा यांनी केलं आहे. साध्वी ऋतंभरा(Sadhvi Rutanbhara) यांनी केलेल्या विधानामुळे आता नवीन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हजारो मुलांनी रामाची वेशभूषा केली होती.(sadhvi rytanbhara statement about hindu)
कानपूरमधील निरालानगर भागातील रेल्वे मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात साध्वी ऋतंभरा यांनी सांगितले की, “प्रत्येक हिंदूने किमान ४ मुले जन्माला घातली पाहिजेत. यापैकी दोन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषद यांच्याकडे सोपवण्यात यावीत. त्यामुळे ही मुले राष्ट्रीय यज्ञामध्ये आपलं योगदान देऊ शकतील.”
यावेळी साध्वी ऋतंभरा यांनी पुढे सांगितले की, “‘रामोत्सवात हजारो श्रीराम रूपांची पूजा करण्यात आली. या सुंदर प्रसंगी रामाचे भक्त होणे हे एक सौभाग्य आहे. रामभक्त होण्यासाठी रामत्व आत्मसात करावे लागते, कारण राम हे अपराजित पौरुषाचे प्रतीक आहे. राजकीय पक्षांनी हिंदूंची विभागणी केली आहे. पण श्रीरामांचं आचरण सर्व समाजाला एक करेल.”
या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे देखील उपस्थित होते. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे म्हणाले की, “एकेकाळी सीतामातेचे अपहरण केल्यामुळे रावणाचा संपूर्ण नाश झाला होता. आज आम्हाला लव्ह जिहाद करणाऱ्या लोकांना नष्ट करायचे आहे. केवळ रामाची पूजा करून हे साध्य होणार नाही.”
त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकारी भैय्याजी जोशी म्हणाले की, “रामजन्म उत्सवाच्या निमित्ताने आपण प्रभू रामासह रामराज्याची कल्पना करतो. रामराज्यात उत्तम शिक्षण आणि सुरक्षा होती. आज आपण आसुरी शक्तींशी लढत आहोत. यामध्ये जय-पराजय झाला, तरी शेवटी विजय सत्याचाच होतो”, असे भैय्याजी जोशी यांनी सांगितले आहे.
विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या या रामोत्सवाच्या कार्यक्रमात सहा हजार मुलांनी रामाची वेशभूषा साकारली होती. तर ११०० मुलांनी हनुमानाची वेशभूषा केली होती. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली, मात्र एवढ्या वर्षांत काँग्रेस पक्ष रामराज्य आणू शकला नाही, अशी टीका विश्व हिंदू परिषदेने या कार्यक्रमात केली.
महत्वाच्या बातम्या :-
३ मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई करणार; नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा
कडवं हिंदुत्व म्हणत राज ठाकरेंच्या शनिवारच्या मांसाहारावरून मिटकरींचा टोला, म्हणाले, राजसाहेब..
नाशिकमध्ये मशिदीच्या १०० मीटर आवारात हनुमान चालिसा लावण्यास बंदी, पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश