ॲड. सदावर्ते राक्षस, तर सदाभाऊ वयोवृद्ध, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून खोत सदावर्ते यांच्यात राडा

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. असे असताना कामगारांचे नेतृत्त्व करणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत आणि कामगारांसाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शाब्दिक खडाजंगी उडाली. यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार खोत यांनी राक्षस म्हणून संबोधल्याने सदावर्ते यांनी खंत व्यक्त केली आहे. यामुळे हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे. आता आंदोलन बाजूला राहिले असून या नेत्यांमध्येच जुंपली आहे.

याबाबत सदावर्ते यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खोत यांनी राक्षस म्हणून संबोधल्याने आपण व्यथित झाल्याचे ते सांगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे. तसेच सदाभाऊ खोत हे वयोवृद्ध नेते असल्याने त्यांना अधिक महत्त्व देत नसल्याची प्रतिक्रिया सदावर्ते यांनी व्यक्त केली.

कामगारांचे नेते असल्याने त्यांच्याविरोधात अधिक काही बोलणार नाही. श्राद्ध किंवा तेरावे घालण्याचा प्रकार म्हणजे एसटी कामगारांना कोणीतरी चुकीचे मार्गदर्शन करत आहे. यासंदर्भात कामगारांना समज दिली असून यापुढे असे होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी सरकारचे तेरावे घातले असून पडळकर यांनी परिवहन मंत्र्यांना साडीचोळीचा आहेर भेट देण्याचे आंदोलन केले होते. यावर सदावर्ते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेत्यांमधील शाब्दिक खडाजंगीमुळे कामगारांमध्येही नेतृत्त्वावरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एका एसटीतील महिला कामगाराने आंदोलनात राजकीय हस्तक्षेप नको असल्याचे म्हटले आहे. ही न्यायालयीन लढाई असून कामगारांचे नेतृत्त्व कामगार नेते अजयकुमार गुजर आणि ॲड. सदावर्ते करतील. आमदार खोत आणि पडळकर यांचे आंदोलनात स्वागत आहे, मात्र आमची लढाई न्यायालयीन आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.