अहमदनगरच्या एका खेड्यात जन्मलेले सदाशिव अमरापूरकर कसे बनले बॉलीवूडचे खतरनाक खलनायक?

ज्या प्रकारे जीवनात दिवस असेल तर रात्र आहे. खोटं असेल तर खरं असतं. त्याचप्रमाणे रामायण असो किंवा महाभारत खलनायकाशिवाय कोणतीही स्टोरी पुर्ण होत नाही. त्याच प्रमाणे बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायक असेल तर नायक असतो. खलनायकाशिवाय कोणताही बॉलीवूड चित्रपट पुर्ण होत नाही.

आज आपण बॉलीवूडच्या अशाच एका खलनायकाबद्दल जाणून घेणार आहोत. जेव्हा पण आपण चित्रपटामध्ये खलनायकाला बघायचो. तेव्हा आपल्याला खुप राग यायचा. आपला हाच राग त्या कलाकाराचा पुरस्कार होता.

पण वेळेसमोर कोणाचेही चालत नाही म्हणतात तेच खरे. जशी जशी वेळ जात गेली तसे तसे बॉलीवूडमधले खलनायक गायब होत गेले. पण त्यांनी आपल्यासाठी त्यांच्या दमदार अभिनयाने भरलेले चित्रपट मागे सोडून गेले. असेच एक दमदार अभिनेते आणि बॉलीवूडचे खतरनाक खलनायक म्हणजे सदाशिव अमरापूरकर.

सदाशिव अमरापूरकरचे नाव घेतले की, आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर नकळत येते ती म्हणजे त्यांनी ‘सडक’ चित्रपटात निभावलेली ट्रान्सजेंडरची भुमिका. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने अशा अनेक भुमिका जिवंत केल्या आहेत. त्यामुळेच त्यांना बॉलीवूडच्या सर्वात भयानक खलनायकांपैकी एक समजले जाते.

त्यांचा जन्म अहमदनगरच्या एका छोट्या गावात झाला होता. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयात रस होता. अनेक वर्षे नाटकात काम केल्यानंतर सदाशिव अमरापूरकरने ‘अर्ध सत्य’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. या चित्रपटात त्यांची भुमिका खुप छोटी होती. पण त्यांनी त्या छोट्या भुमिकेतुनच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

त्यांच्यानंतरच त्यांचा अभिनयातील कधीच न संपणारा प्रवास सुरू झाला. त्यांनी हिंदी मराठी, तामिळ, तेलगू, उडिया, बंगालीमध्ये ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. यात त्यांनी कॉमेडी, वडील, भाऊ, राजकारणी अशा कित्येक भुमिका केल्या. पण त्यांना सर्वाधिक पसंत केले गेले ते म्हणजे खलनायकाच्या रूपात.

वेगवेगळ्या भुमिका करून सुद्धा त्यांना खलनायक म्हणूनच ओळख मिळाली. आजही त्यांची ती ओळख कायम आहे. भलेही लोकं त्यांना खलनायक म्हणत असतील. पण त्यांच्यासाठी लोकांचा हा रागच खुप मोठा पुरस्कार होता. लोकं जेवढे त्यांच्यावर चिडतील तेवढे त्यांचे काम अधिक चांगले व्हायचे.

फक्त खलनायक म्हणूनच नाही तर त्यांनी अभिनयात अनेक प्रयोग केले. १९८३ मध्ये रिलीज झालेल्या आंखे चित्रपटात त्यांनी कॉमेडी केली होती. त्यांच्या कॉमेडीला देखील लोकांनी खुप पसंत केले. अशाच प्रकारे त्यांनी काही चांगल्या तर काही वाईट भुमिका केल्या.

पण सडक चित्रपटाच्या रिलीजनंतर मात्र त्यांना खलनायक म्हणूनच ओळख मिळाली. सडक चित्रपटात त्यांनी ट्रान्सजेंडरची भुमिका केली होती. हा चित्रपट पहिल्यानंतर लोकांना सदाशिव अमरापूरकरची भीती वाटू लागली होती. एवढ्या उत्तम पद्धतीने त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी लक्ष्मी भुमिका जिवंत केली होती.

सडक चित्रपट सदाशिव अमरापूरकरच्या करिअरमधला टर्निंग पॉईंट ठरला होता. या चित्रपटानंतर त्यांचे करिअर बदलून गेले. त्यांना खलनायकाच्या भुमिकेच्या अनेक ऑफर आल्या. या भूमिकेसाठी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांनी सडक, आंखे, मेहरबान, बारिश, मोहरा, आग, कुली नंबर 1, जंग, गुप्त, अंटी नंबर1, हम साथ साथ है, इश्क, एक गाव सावरखेड अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार भुमिका निभावल्या. अभिनयासोबतच त्यांनी समाजसेवेचे काम देखील केले.

चित्रपटांसोबतच एक नजर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडेही टाकूयात. त्यांच्या पत्नीचे नाव होते सुनंदा करमरकर. ज्या शाळेच्या दिवसांपासूनच त्यांच्यासोबत होत्या. १९७३ मध्ये त्यांनी लग्न केले होते. त्यांची मुलगी रिमा अमरापूरकर सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.

सदाशिव अमरापूरकर २०१३ मध्ये बॉम्बे टॉकीज चित्रपटात शेवटचे दिसले होते. २०१४ मध्ये दीर्घ आजारामूळे त्यांचा मृत्यू झाला. पण आजही लोकं त्यांच्या भूमिकांची आठवण काढत असतात. ज्या प्रकारे सदाशिव अमरापूरकरने खलनायक म्हणून काम केले. तसे काम आजपर्यंत कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्याला जमले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

लग्नाच्या १७ वर्षांनंतर आयशा झुल्काने पतीबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाली…

‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपूडा; फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

भारतात भितीदायक कोरोना, तरीही आयपीएल सुरू, तुम्हाला काही वाटत नाही का? गिलख्रीस्टने सुनावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.