Share

“दोन वाडपे जर व्यवस्थित वाढत असतील, तर ४० जणांची गरज काय?”, सदाभाऊ खोत यांच्या भाषणाची चर्चा

sadabhau khota

पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी जन्मशताब्दी निम्मित सांगली जिल्ह्यातील वाळव्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत, शिंदे गटात सामील झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी जोरदार भाषण केले.(Sadabhau Khot’s statement on eknath shinde and devendra fadanvis viral)

दोन वाडपे जर व्यवस्थित वाढत असतील, तर ४० जणांची गरज काय आहे, असं वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सध्याचे नवीन सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे चालवत आहेत. त्यांच्या कार्यकाळात सध्या महाराष्ट्रात चांगलं कामं सुरु आहे, असे देखील रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

सरकार नसल्यावर लयं वाईट परिस्थिती असते, असे देखील कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी शिंदे गटात सामील झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे कौतुक केले. आमदार शहाजीबापू पाटील लवकरचं मंत्री होतील, असे देखील सदाभाऊ खोत यांनी कार्यक्रमात सांगितले.

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत म्हणाले की, “आमदार शहाजीबापू पाटील सुरवातीला सुरतवरून गुवाहाटीला गेले. त्यानंतर पुढे गोव्यात जाऊन पोहचले. आता शहाजीबापू महाराष्ट्रातलं सरकार घालवून वाळव्याला आले आहेत. बापूंचं ओक्के आहे”, असे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, “सत्ता असताना सकाळी घरासमोर एक किलोमीटरची रांग असायची. पण सत्ता गेल्यानंतर सगळी गर्दी गायब झाली आहे”, असे सदाभाऊ खोत यांनी कार्यक्रमात सांगितले. “एसटी कर्मचारी आमच्या सरकारमध्ये सुखी राहणार आहेत. शहाजीबापू तुम्हाला परिवहन खाते देऊन टाकतो. आता तुम्ही म्हणालं हे पद वाटप करत बसलाय का?”, असे देखील सदाभाऊ खोत यांनी कार्यक्रमात सांगितले.

या कार्यक्रमामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील भाषण केले. यावेळी भाषणात आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, “हातातला मोबाइल जेवढा चांगला, तेवढाच वाईट. पण मोबाइलमधील एका वाक्याने मला जगभर पोहचवण्याचं काम केलं. डोंगर-झाडाने मला चांगले दिवस आले आहेत”, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाषणात सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
उद्धव ठाकरे जोरदार कमबॅक करणार? घेतला ‘हा’ मोठा निर्णय
बंडखोरी केलेल्या आमदारांना वठणीवर आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय
बिल गेट्सला मागे टाकत ‘हा’ भारतीय उद्योगपती बनला जगातील चौथा सर्वात श्रीमंत व्यक्ती

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now