Share

भाजपकडून सदाभाऊ खोतांना डच्चू? विधान परिषद निवडणूकीत विश्रांती घेण्याचा सल्ला

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना डावलले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपने यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विश्रांती देण्याचे ठरवले आहे.(sadabhau khot rejected for vidhan parishad election from bjp )

भाजपने यासंदर्भांतील निरोप सदाभाऊ खोत यांना दिली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेच्या एकाही जागेसाठी आतापर्यंत मागणी केलेली नाही. भाजपने विधानसभेच्या निवडणुकांसाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत युती केली होती. त्यावेळी भाजपने सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेचे आमदार केले होते.

त्यावेळी सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते. त्यानंतर राजू शेट्टी यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी रयत क्रांती नावाच्या नवीन संघटनेची स्थापना केली. नवीन संघटनेची स्थापना केली असली तरीही सदाभाऊ खोत भाजपशी एकनिष्ठ राहिले.

रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांचे भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणासाठी आंदोलन केले होते. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विलनीकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

त्यांनी भाजप नेत्यांसोबत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अनेक आंदोलने केली. त्यामुळे भाजपकडून सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेच्या आमदारकीसाठी दुसऱ्यांदा संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण सदाभाऊ खोत यांना या निवडणुकीसाठी भाजपकडून थांबण्यास सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. सदाभाऊ खोत यांना विधानसभेसाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचा पर्याय आहे, पण त्या ठिकाणी सदाभाऊ खोत यांच्यासमोर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचे आव्हान असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-
फोन वाजला अन् रजत पाटीदारने स्वत:च्या लग्नाची तयारी सोडून थेट गाठली IPL, वाचा भन्नाट किस्सा
बबिताजींच्या ‘त्या’ कृतीनंतर सेटवरच भडकले होते जेठालाल, म्हणाले, तुमच्या वागणुकीमूळे..
६ जण शुन्यावर बाद झाले पण.., १४५ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही की वाचून थक्क व्हाल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now