Homeताज्या बातम्या“…म्हणजे हे तर असं झालं, मुलं स्वतः जन्माला घालायची आणि नाव शेजाऱ्याचे...

“…म्हणजे हे तर असं झालं, मुलं स्वतः जन्माला घालायची आणि नाव शेजाऱ्याचे लावायचे”

कोरोनाची तिसरी लाट येणार का? याबाबत अजूनही वेगवेगळी विधाने केली जात आहे. तसेच राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे तज्ज्ञ नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. अशात कोरोनामुळे राजकारणातही आरोप प्रत्यारोपण सुरु आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यावरुन आता भाजपही मलिकांवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात मलिकांच्या विधानावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मालिकांच्या विधानावर सदाभाऊ झोत चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी शेलक्या शब्दांमध्ये मलिकांवर टीका केली आहे. सध्या त्यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालिकांच्या विधानावर बोलताना, मुलं स्वतः जन्माला घालायची आणि नाव शेजाऱ्याचे लावायचे, असे आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

कोरोनाची तिसरी लाट आल्यास भाजप जबाबदार- नवाब मीया, हे म्हणजे असं झालंय मुलं स्वतः जन्माला घालायची, नाव मात्र शेजाऱ्याचे लावायचे, असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून नेटकाऱ्यांचाही त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे.

तसेच सदाभाऊ खोत यांवही राजकीय वर्तुळातही चार्व्ह रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत हे महाविकास आघाडीवर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी पाठिंबा फिला असून राज्य सरकारच्या कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते एस टी महामंडळाच्या विलीगीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करत आहे.

दरम्यान, नवाब मालिकांनी एक पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गेल्या काही महिन्यात एनसीबीने ज्या कारवाया केल्या आहे. त्या फर्जीवाडा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचा पुरावा म्हणून नवाब मलिकांनी यावेळी काही फोन रेकॉर्डिंगही पत्रकारांना ऐकवले आहे.

महत्वाच्या बातम्या-
सावध! भारतात तिसऱ्या लाटेचे संकेत, २४ तासांतील धक्कादायक आकडेवारी आली समोर..
नाईट सुटमध्येच विकी कौशलला ड्रॉप करण्यासाठी पोहोचली कतरिना, एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल
मृत्यूही हे नाते तोडू शकला नाही… पतीच्या मृत्यूनंतर काही क्षणातच पत्नीने जग सोडले, एकाच चितेवर केले अंत्यसंस्कार

ताज्या बातम्या