मुंबई | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून चांगलेच राजकारण रंगले आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आमनेसामने आले होते. आता यांच्या वादात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे.
याबाबत ते सांगलीत बोलत होते. ते म्हणाले, “मिटकरी यांनी आरोप केला होता की दारु विकली म्हणे. मी म्हणतोय गांजाही विकत होतो. तू येतोस का चिलीम लावायला,” असे म्हणत खोत यांनी मिटकरी यांच्यावर तिखट शब्दात टिका केली.
वाचा काय म्हणाले होते अमोल मिटकरी…
काही दिवसांपुर्वी मिटकरींनी पडळकरांना चोख प्रत्युत्तर दिले होते. ‘मी शिवचरित्र सांगितलं. फाट्यावर दारू तर विकली नाही ना. एखाद्या वृद्ध महिलेची २ कोटींची जमीन ५ लाखात तर हडप केली नाही ना?, असा संतप्त सवाल मिटकरींनी पडळकरांवर टिका करताना उपस्थित केला होता.
तसेच ‘मी बोलायला लागलो, तर संपूर्ण कुंडली तयार आहे. पण वेट अँड वॉच. समय जरुर आयेगा. ज्या दिवशी बोलेन, त्या दिवशी पळता भुई थोडी होईल, असे म्हणत मिटकरींनी पडळकरांना इशारा दिला होता. तसेच ‘माझ्यासवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरे असल्यानं नाव न घेता बोलतो. तुम्ही गाळलेल्या जागा भरा, असेही ते म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
अखेर प्रतीक्षा संपली; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता करणार सरसेनापती हंबीररावांची भूमिका
कार्यकर्त्यांचा चांदीच्या चपला, पॅशन बाईक देऊन केला सन्मान; पडळकरांच्या डोळ्यात अश्रू
शिवाजी महाराज यांच्या हाताचा ठसा असलेला फोटो पाहिलात का? पहा फोटो
प्रेग्नेंसीनंतरचा सपना चौधरीच्या डान्सचा ‘तो’ खतरनाक एकदा व्हिडीओ पहाच..