कुकूने घेतला कंगनाशी पंगा; कोणाला खुश करायला हे करतेस म्हणत कंगनानेही दिले जोरदार उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाली आहे.

कंगना सध्या बॉलीवूडमधील घराणेशाहीवर मोठ्या प्रमाणावर टिका करत आहे. ती अनेक बॉलीवूड कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्यावर कडाडून टिका करत आहे.

बिनधास्त प्रतिक्रियांमुळे कंगनाला ट्रोल देखील केले जाते. या पार्श्वभूमीवर अलिकडेच ट्विटरवर ‘सस्पेंड टिम कंगना’ हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. या हॅशटॅगला अभिनेत्री कुब्रा सैतने पाठिंबा दिला आहे.

कुब्रा ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधून प्रसिद्ध झाली आहे. ‘सस्पेंड टिम कंगना’ या हॅशटॅग ट्रेंडला पाठिंबा देत कुब्राने कंगनावर निशाणा साधला आहे. कंगनाची टीम देखील शांत बसली नाही. तिने कुब्राच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कुब्राने ट्वीट केले आहे की, ‘#सस्पेंड टिम कंगना या हॅशटॅगचं मी समर्थन करते. ट्विटरने या ट्रेंडकडे लक्ष द्यावे. आजचा दिवस सोडला तर या अकाउंटवरुन कधीही सकारात्मक ट्वीट केले गेलेले नाही.’

तिच्या या ट्विटवर कंगनाच्या टिमने जोरदार उत्तर दिले आहे. कंगनाच्या टिमने ट्वीट केले आहे की, ‘प्रिय कुब्रा सैत, कंगनाने तुझे काय नुकसान केले. ज्यामुळे तू तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात आवाज उठवत आहेस. तूझी नेमकी समस्या काय आहे? तुला खरंच कंगनाविरोधात बोलायचे आहे की कोणाला तरी खुश करायचंय?’

असे ट्वीट करुन कंगनाच्या टीमने कुब्राला प्रत्युत्तर दिले आहे. हे दोन्ही ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. हे ट्वीट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.