सचिन वाझेंना आता ठाकरे सरकारचाच दणका; केली मोठी कारवाई

मुंबई | मागील काही दिवसांपासुन चर्चेत असणारे एपीआय सचिन वाझे यांना आणखी एक झटका बसला आहे. त्यांना पोलिस दलातून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे. ते मुंबई पोलिस दलात एपीआय पदावर कार्यरत होते.

मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पियो सापडली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

एनअयाकडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर चौकशी केली. यानंतर रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली होती. यानंतर आज (रविवारी) त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यामध्ये त्यांना २५ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

विरोधी पक्षाकडून त्यांना अटक करण्याची आणि त्यांचे निलंबन करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती. अशात त्यांना अटक झाली आणि आता ठाकरे सरकारने त्यांना निलंबनाचा चांगलाच दणका दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
वाझे कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया; ‘सचिन वाझे यांना अडकवलं जातंय’
अखेर सचिन वाझे गजाआड, १३ तासांच्या चौकशीनंतर NIA ने ठोकल्या बेड्या
विरोधकांपुढे ठाकरे सरकार नमले, सचिन वाझेंबाबत गृहमत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.