अखेर सचिन वाझेनी दिली गुन्ह्याची कबुली म्हणाला, सारं मीच केलं; कारण….

मुंबई | मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यापासून याबाबत रोज नवे खळबळजनक खुलासे होत आहेत. आता NIA ने अटक केलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझेनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. यामुळे आता वाझेच पितळ उघडे पडले आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली, “ती कार मीच तिथे ठेवण्याचा कट केला होता”. असे सचिन वाझेने NIA ला सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती NIA च्या सूत्रांकडून एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. परंतु हा सर्व कट करण्यापाठीमागे सचिन वाझेने सांगितलेले कारण धक्कादायक आहे.

अनेक वर्षे सेवेतून बाहेर असल्याने वाझेच्या कार्यतत्परतेवर सवाल उपस्थित झाले होते. ते होऊ नये आणि आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी हा सर्व खटाटोप केला असल्याची माहिती वाझेनी दिली आहे.

स्फोटकांनी भरलेली कार अंबानी यांच्या घराबाहेर ठेवायची आणि नंतर झटपट तपास करून आपण आजूनही त्याच तोडीचे कार्यक्षम पोलीस अधिकारी आहोत हे सर्वांना दाखवून द्यावं या उद्देशाने हा सारा कट केला, असं वाझे याने NIA चौकशीत स्पष्ट केले आहे. वाझे याच्या कबूलीनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. आता NIA चे अधिकारी त्याचा खरच हाच उद्देश होता का याबाबतचा तपास करत आहेत.

दरम्यान, न्यायालयाने वाझेला २५ मार्च पर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर नव्या गोष्टींचा उलगडा झाला. यामुळे न्यायालयाने वाझेच्या NIA कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. याशिवाय वाझे याला अटक केल्यानंतर पोलीस प्रशासन आणि राज्याच्या राजकारणात अनेक उलटफेर झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
सचिन वाझे आता पुरते अडकले, जानेवारीतच आयुक्तालयात कट रचल्याची धक्कादायक माहिती उघड
“अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव”
गृहमंत्री अनिल देशमुखांनी लिहिलं थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.