सचिन वाझे पुरते अडकले, कोर्टाने दिली तब्बल दहा दिवसांची कोठडी

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. आता याप्रकरणी सचिन वाझे यांना कोर्टाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२०बी आणि ४ (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम १९०८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पियो सापडली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

एनअयाकडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर चौकशी केली. यानंतर रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली होती. यानंतर आज (रविवारी) त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यामध्ये त्यांना २५ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणतात…
आता जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने खळबळ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.