अखेर सचिन वाझे गजाआड, १३ तासांच्या चौकशीनंतर NIA ने ठोकल्या बेड्या

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अखेर NIA कडून अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे यांना तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अटक झाली आहे.

दरम्यान, मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पियो सापडली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

एनआयएकडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर चौकशी केली. यानंतर रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनआयएच्या अधिकाऱ्यांने अधिकृत माहिती दिली आहे.

वाझे यांना अटक केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. एनआयएने वाझे यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

दरम्यान, यापुर्वी अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक ठेवण्यात आली होती. याबाबतचा तपास एन्काउंटर स्पेशलिस्ट वाझे यांच्याकडे देण्यात आला होता. पण जेव्हा या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यु झाल्यानंतर वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

विरोधी पक्षाकडून त्यांना अटक करण्याची आणि त्यांचे निलंबन करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती.

महत्वाच्या बातम्या-
आता जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने खळबळ
दोन दिवसापासून चर्चेत असलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे कोण आहेत माहिती आहे का?
विरोधकांपुढे ठाकरे सरकार नमले, सचिन वाझेंबाबत गृहमत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.