शिवसेना मंत्री अनिल परब यांनी मला ५० कोटी वसूल करण्यास सांगीतले; सचिन वाझेचा गंभीर आरोप

मुंबई: सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत मुंबईतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली आहे. सचिन वाझे यांची कोठडी आज संपणार असल्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांची कोठडी वाढवण्यासाठी सचिन वाझेला कोर्टात दाखल करण्यात आले. पण सचिन वाझेचे जे पत्र समोर आले त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

अनिल परब यांनी भेंडी बाजारमधील सैफी बुऱ्हानी ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या भव्य क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची चौकशी करावी आणि त्यांच्या ट्रस्टीना वाटाघाटी करण्यासाठी माझ्यासमोर आणावे असे सांगीतले. त्यांच्याकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी तू प्राथमिक बोलणी करून घे, असे त्यांनी मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलवून सांगितले”, असा आरोप सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. त्यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितलं की, मला पुन्हा सेवेत घेण्यास शरद पवार यांचा विरोध आहे. तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितलं की ते पवारांचं मन वळवतील आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली.एवढी मोठी रक्कम देण्यास मी असमर्थता दर्शवली. त्यावर गृहमंत्र्यांनी मला नंतर ही रक्कम देण्यास सांगितलं. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बार अँड रेस्टॉरंटमधून पैसे वसूल करण्यास सांगितले. मुंबईत जवळपास १,६५० बार अँड रेस्टॉरंट असतील, प्रत्येकाकडून तीन ते साडे तीन लाख रुपये गोळा कर, असे त्यांनी सांगितले. मी त्यांना म्हटले की, माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत दोनशेच बार अँड रेस्टॉरंट असतील. शिवाय मी अशी वसुली करणार नसल्याचेही त्यांना सांगितले.

मात्र, ज्ञानेश्वर बंगल्यातील त्यांच्या चेंबरमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या पीएने देशमुख सरांची मागणी मान्य करण्याचा सल्ला मला दिला. मात्र, मी नकार दिला आणि याविषयी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना कळवले. त्यांनी मला असे कोणतेही बेकायदा कृत्य करू नये, असा सल्ला दिला”, असा दावाही वाझे यांनी पत्रात केला आहे.

इतकंच नाही तर सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नावही या पत्रात आहे. सचिन वाझेच्या पत्रात म्हटलय की, दर्शन घोडावत हा माणूस मला भेटला. तो बोलला की मी अजित पवारांच्या जवळचा आहे. मी गुटखाकिंग आहे. गुटखावाल्याकडून १०० कोटींची व्यवस्था होऊ शकते. असं दर्शन घोडावतने सांगीतल्याचं सचिन वाझे म्हणतो.

या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील तीन मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस दलात पुर्ननियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी दोन कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी  केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता एनआयए कोर्टाला दिलं जाणार आहे.

मुंबईतील बार आणि पब कडूनही वसुली करण्याचे टार्गेट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  दिलं होतं, असा खुलासा सचिन वाझे यांच्या पत्रात करण्यात आला आहे.दरम्यान, या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

या प्रकरणात आता एनआयए बरोबरच आता सीबीआयकडून तपासाला सुरुवात होणार आहे. इतकच नाही तर संबंधित पत्रावरुन मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. पत्रावरुन वाझे यांनी घुमजाव करु नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
डाव उलटला! आता परमबीरसिंगही अडकणार? एनआयए परमबीरांचीच चौकशी करणार; हाजीर हो
नेत्यांच्या सभा होतात पण उद्योगांना बंदी; अनिल अंबानीच्या मुलाची ठाकरे सरकारवर बोचरी टीका
अनिल देशमुख प्रकरणात शरद पवारांनी दबाव आणला; मुख्य न्यायाधीशांनीही म्हटलं हे तर दबावतंत्र: जयश्री पाटलांचा आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.