आता जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने खळबळ

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण सध्या खुप तापलेले आहे. विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला या प्रकरणावरून वेठीस धरले आहे. यामध्ये विरोधकांकडून वारंवार सचिन वाझे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.

याचदरम्यान सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथकाने तब्बल दहा तास चौकशी केली. याची सुरूवात झाली होती जेव्हा मुकेश यांच्या ऑटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पियो सापडली होती.

याचा तपास एन्काउंटर स्पेशलिस्ट वाझे यांच्याकडे देण्यात आला होता. पण जेव्हा या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यु झाल्यानंतर वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाकडून त्यांना अटक करण्याची आणि त्यांचे निलंबन करण्याची मागणी होत आहे.

त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती. शुक्रवारी त्यांची विशेष शाखा १ बदली करण्यात आली. यानंतर वाझे यांनी मिडीयासमोर काहीही बोलणे टाळले होते. पण आज त्यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस टाकून सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, ३ मार्च रोजी सीआयडीमधील काही अधिकाऱ्यांनी मला एका खोट्या प्रकरणात अटक केली होती. मला केलेली ही अटक आजपर्यंत चुकीची आहे. या इतिहासाची मला आता पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

माझे अधिकारी मला चुकीच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. १७ वर्षे माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती. पण आता माझ्याकडे आयुष्याची १७ वर्षेही नाहीत, ना नोकरी, ना जगण्याची अपेक्षा आहे.

जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली आहे. असं त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाने आता सर्वत्र खळबळ माजली आहे. आता यावर ठाकरे सरकार काय निर्णय घेतंय याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या
…आणि तिनेच मला चपलीने मारले, त्या झोमॅटो डिलीव्हरी बॉयचा अजब खुलासा
मुलीसाठी काहीपण! हाताला मिळेल ते काम करुन ही उच्चशिक्षित महिला करतेय मुलीचा सांभाळ
जेव्हा रतन टाटा पडले होते प्रेमात पण, चीनमुळे झाला होता त्यांचा ब्रेकअप; वाचा नक्की काय झालं होतं
मोठी बातमी! रेखा जरे हत्याप्रकरण, पत्रकार बाळ बोठेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.