अर्णबला घरात घुसून उचलणारे एनकाऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे कोण आहेत माहिती आहे का?

अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली. २०१८ ला अन्वय नाईक आत्महत्या केली होती. त्यामुळे हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. पण अर्णबला घरातून उचलणारे सचिन वाझे कोण आहेत माहिती आहे का? कारण सध्या त्यांची जोरदार चर्चा होत आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही सचिन वाझे हे नाव तुम्ही ऐकले असेल. सचिन वाझे मूळचे कोल्हापूरचे आहेत. २२ फेब्रुवारी १९७२ रोजी त्यांचा जन्म झाला होता.

१९९० साली त्यांनी पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम हाती घेतले. नक्षल प्रभावी भागात त्यांची पोस्टिंग झाली होती म्हणजे गडचिरोली येथे. त्यामुळे त्यांची खऱ्या अर्थाने ट्रेनिंग गडचिरोली येथेच झाली.

त्यांचे काम पाहून त्यांना १९९२ साली ठाणे येथे पाठवण्यात आले. नक्षलग्रस्त भागात काम केल्याने त्यांच्या मनात कसलीही भीती नव्हती. मुंबईत धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या भागात सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

त्यामुळे त्यांच्या या कामगीरीमुळे त्यांना बढती मिळाली आणि तेवढी इज्जतही त्यांना होती. ३० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी एनकाऊंटर स्पेशलिस्ट म्हणून नाव कमवले. ६९ कुख्यात गुंडांना त्यांनी आतापर्यंत यमलोकमध्ये पाठवले आहे.

यातील एक नाव होते मुन्ना नेपाली. मुन्ना नेपालीचा एनकाऊंटर केल्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. पण काही प्रकरणात त्यांची बदनामीदेखील झाली होती. २००२ साली घाटकोपर बॉम्ब ब्लास्ट केसचा प्रमुख आरोपी मोहम्मद युनूस याच्या कथित हत्येप्रकरणी वाझे यांना सस्पेंड करण्यात आले होते.

२००७ साली त्यांनी राजीनामा दिला होता. २०२० साली अधकाऱ्यांची कमतरता भासू लागली त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत बोलवण्यात आले. वाझे यांचा सायबर गुन्हे प्रकरणात खूप मोठा अभ्यास आहे.

त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. जसे की, जिंकून हरलेली लढाई, द स्कॉट, शीना बोरा, द मर्डर दॅट शॉक इंडिया. तसेच काही मासिकांमध्ये आणि वर्तमानपत्र यांच्यात वाझे यांचे लेख सातत्याने प्रसिद्ध होत असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.