दोन दिवसापासून चर्चेत असलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे कोण आहेत माहिती आहे का?

सध्या मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण खुप तापलेले आहे. ठाकरे सरकारवर या मृत्यु प्रकरणावरून खुप टीका होत आहे. भाजपने राज्य सरकारला वेठीस धरले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली एक बॅग सापडली होती आणि ती बॅग ज्या गाडीत होती त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन हे होते.

त्यांच्या मृत्युनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात विरोधकांकडून एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांचे नाव सारखे घेतले जात आहे. भाजप आणि मनसेने सचिन वाझे यांच्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. पण सचिन वाझे कोण आहेत हे तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहोत.

१९९० साली त्यांनी पोलिस उपनिरीक्षक म्हणून सचिन वाझे यांनी काम हाती घेतले. नक्षल प्रभावी भागात त्यांची पोस्टिंग झाली होती म्हणजे गडचिरोली येथे. त्यामुळे त्यांची खऱ्या अर्थाने ट्रेनिंग गडचिरोली येथेच झाली.

त्यांचे काम पाहून त्यांना १९९२ साली ठाणे येथे पाठवण्यात आले. नक्षलग्रस्त भागात काम केल्याने त्यांच्या मनात कसलीही भीती नव्हती. मुंबईत धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या भागात सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

त्यामुळे त्यांच्या या कामगीरीमुळे त्यांना बढती मिळाली आणि तेवढी इज्जतही त्यांना होती. ३० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी एनकाऊंटर स्पेशलिस्ट म्हणून नाव कमवले. ६९ कुख्यात गुंडांना त्यांनी आतापर्यंत यमलोकमध्ये पाठवले आहे.

यातील एक नाव होते मुन्ना नेपाली. मुन्ना नेपालीचा एनकाऊंटर केल्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. पण काही प्रकरणात त्यांची बदनामीदेखील झाली होती. २००२ साली घाटकोपर बॉम्ब ब्लास्ट केसचा प्रमुख आरोपी मोहम्मद युनूस याच्या कथित हत्येप्रकरणी वाझे यांना सस्पेंड करण्यात आले होते.

२००७ साली त्यांनी राजीनामा दिला होता. २०२० साली अधिकाऱ्यांची कमतरता भासू लागली त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत बोलवण्यात आले. वाझे यांचा सायबर गुन्हे प्रकरणात खूप मोठा अभ्यास आहे.

त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. जसे की, जिंकून हरलेली लढाई, द स्कॉट, शीना बोरा, द मर्डर दॅट शॉक इंडिया. तसेच काही मासिकांमध्ये आणि वर्तमानपत्र यांच्यात वाझे यांचे लेख सातत्याने प्रसिद्ध होत असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.