धक्कादायक! सचिन वाझेंची प्रकृती चिंताजनक, हृदयात ९० टक्के ब्लॉकेज; वकिलांनी केली ‘ही’ मागणी

 

 

सचिन वाझे प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी येथे सापडला होता.

त्यामुळे या प्रकरणात सचिन वाझेंना एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर रोज वेगवेगळे खुलासे होत आहे. रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे, अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सचिन वाझे यांच्या प्रकृतीबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. वाझे यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ९० टक्के रक्तवाहिन्या ब्लॉक असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे विशेष न्यायालयात सचिन वाझेंना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी त्यांचे वकील आबाद पोंडा यांनी अर्ज दाखल केला आहे.

सचिन वाझे यांची कोठडी ३ एप्रिलला संपत आहे, त्यामुळे त्यांना  पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आले आहे. त्यावेळी न्यायालयाने सचिन वाझेंचा वैद्यकीय अहवाल मागवला असता, सचिन वाझे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान २ ते ३ वेळा सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले होते, तेव्हा वाझेंच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये वाझेंना मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.