सचिन वाझे प्रकरणात ट्विस्ट, स्फोटकांची गाडी सचिन वाझेने नाही तर ‘या’ माणसाने केली होती पार्क

 

सचिन वाझे प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा येथी खाडीकिनारी येथे सापडला होता.

त्यामुळे या प्रकरणात सचिन वाझेंना एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर रोज वेगवेगळे खुलासे होत आहे. आता पुन्हा एक धक्कादायक खुलासा एनआयएकडून करण्यात आला आहे.

स्फोटकांनी भरलेल्या कारबद्दल खुलासा करत, ही कार अंबानी यांच्या घराजवळ सचिन वाझे यांनी पार्क नव्हती केली, तर ही कार त्यांच्या खाजगी ड्रायव्हरने पार्क केली होती. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा नवीन वळण घेण्याची शक्यता आहे.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत एनआयएने सांगितले की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात सहभागी होते.

तसेच हिरेन यांची हत्या कोणी केली त्यांच्या मागचा हेतू काय होता, इथंपर्यंत तपास पोहचला आहे. एनआयएने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.