सचिन वाझे प्रकरण: ‘मिस्ट्री वूमन’ NIA च्या ताब्यात, सचिन वाझे यांचा खेळ खल्लास?

 

सचिन वाझे प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी येथे सापडला होता.

त्यामुळे या प्रकरणात सचिन वाझेंना एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर रोज वेगवेगळे खुलासे होत आहे. रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे

आता एनआयएने सचिन वाझे सोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दिसलेल्या मिस्ट्री वुमनला ताब्यात घेतले आहे. ही महिला १६ फेब्रुवारीला सचिन वाझेसोबत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दिसली होती. सर्च ऑपरेशन दरम्यान ठाण्याच्या एका फ्लॅटमधून या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही महिला सचिन वाझेंची निकटवर्तीय असण्याची शक्यता आहे. तसेच ही महिला सचिन वाझे यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी काम करत होती. तिच्याकडे नोटा मोजण्याची मशीन सुद्धा होती, तिचीच मशीन सचिन वाझे यांच्या मर्सिडीजमध्ये आढळली होती.

१६ फेब्रुवारीला सचिन वाझे हे दक्षिण मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये या महिलेसोबत होते, तेव्हा सचिन वाझे यांच्याकडे पाच बॅगा होत्या, त्यामध्ये पैसे भरलेले होते, या महिलेबाबत आणखी कोणतीही माहिती मिळालेली नाही, अशी माहिती एनआयए दिली आहे.

३ एप्रिलला सचिन वाझे यांची कोठडी संपत आहे, त्यावेळी पुन्हा सचिन वाझे यांना कोर्टात करण्यात येईल. अशात मिस्ट्री वूमन मिळाल्याने आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.