सचिन वाझेंचे शिवसेना मंत्री अनिल परबांशी संबंध; किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना राजकीय चर्चेला पण मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परत एक नवीन वळण घेण्यात आले आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझेला पोलिसांनी अटक केल्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाकडे पाहण्याचा पण नागरिकांचा दृष्टीकोन बदलला आहे. या प्रकरणात सचिन वाझेनंतर अनेक पोलीस अधिकार्यांवर पण या प्रकरणाचा आळ घेण्यात आला.

आता तर भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. किरीट सोमैय्या यांनी काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते.

किरीट सोमैय्या यांनी म्हटले होते की, अनिल परब यांनी दापोलीत एक रिसॉर्ट बांधले असून त्यासाठी त्यांना १० कोटी रुपयांचा खर्च आला. याचा हिशोब त्यांनी द्यावा अशी मागणी किरीट सोमैय्या यांनी केली होती.

सचिन वाझेच्या पार्किंगमध्ये प्राडो गाडी सापडली होती. त्या गाडीचा संबंध अनिल परब यांच्याशी असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. आज किरीट सोमैय्या यांनी आरोप केल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ही कार सध्या NIA च्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारचा अनिल परब यांच्याशी अप्रत्यक्ष संबंध असल्याचा आरॊप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. अनिल परब यांचे भागीदार विजय भोसले यांनी ही वाझेला ही गाडी दिल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या
1 ते 5 कोटीपर्यंतचे कर्ज मिळणार चुटकीसरशी; घ्या अधिक जाणून

बँक ऑफ बडोदाचे १ जूनपासून ‘हा’ नियम बदलणार; ग्राहकांच्या डोक्याला वाढणार ताप

महाराष्ट्र राज्यात होतोय कोरोना कमी; घ्या आजची स्थिती जाणून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.