वाझे कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया; ‘सचिन वाझे यांना अडकवलं जातंय’

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबियांयांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सचिन वाझे यांची बंधू सुधर्म वाझे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘वाझे यांना या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. त्यांना अटक झाल्याची माहिती आम्हाला कुणीही दिली नाही.

मीडियाच्या माध्यमातून त्यांना अटक झाल्याचं आम्हाला कळालं. सचिन वाझे यांच्या पत्नी यांनाही ही माहिती नव्हती, अशी माहिती सुधर्म वाझे यांनी दिली आहे. सचिन वाझे यांनी काल जे स्टेटस ठेवलं त्यात त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली, असे सुधर्म वाझे यांनी सांगितले. ते संपूर्ण सहकार्य करतील, असेही सुधर्म वाझे यांनी म्हटले.

दरम्यान, मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पियो सापडली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

एनअयाकडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर चौकशी केली. यानंतर रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनाआयच्या अधिकाऱ्यांने अधिकृत माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

सचिन वाझे पुरते अडकले, कोर्टाने दिली तब्बल दहा दिवसांची कोठडी

सोनम कपूरच्या छोट्या बहीणीने शेअर केले बिकनीतील फोटो; सोशल मिडीयावर रंगली चर्चा

खुशखबर! कुसुम योजनेचा २० लाख शेतकऱ्यांना लाभ, सौर पंप मिळवण्यासाठी असा करा अर्ज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.