जेव्हा सचिनने आणि सेहवागने ड्रेसिंगरूममध्ये केली होती गांगुलीची फजिती, किस्सा वाचून पोट धरून हसाल

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सगळ्यांना माहिती आहे. अनेक लोक या कार्यक्रमाचे चाहते आहेत. अनेक मोठे कलाकार, सेलिब्रिटी, खेळाडू, राजकारणी या कार्यक्रमात येत असतात. एकदा क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर या कार्यक्रमात आला होता.

तेव्हा डॉ. निलेश साबळेने सचिनला क्रिकेटमधील काही भन्नाट किस्से विचारले. तेव्हा सचिनने अनेक क्रिकेटचे भन्नाट किस्से सांगितले. डॉ. निलेश साबळेंनी त्यांना विचारले की ड्रेसिंग रूममधील अनेक किस्से असतील तर त्यातील एक मस्त किस्सा आम्हाला सांगा.

ड्रेसिंग रूममधील अनेक किस्से पोट धरून हासायला लावणारे आहेत. सचिन म्हणाला की आम्ही एकदा सौरभ गांगुलीची फजिती करण्याचे ठरवले होते. त्यावेळी यामध्ये मी आणि सेहवाग सामील होतो.

तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये वीरेंद्र सेहवाग, सौरभ गागुंली आणि सचिन हे तिघेच होते. ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते. तर सचिनने सेहवागला त्याच्याजवळ बोलावले आणि सांगितले की आपण सौरभची मजा घेऊया.

सचिन त्यावेळी खूप खोडकर होता. तेव्हा सेहवाग सचिनला म्हणाला की आपण काय करायचं? तेव्हा सचिन म्हणाला की तु फक्त शांत उभा राहा आणि मी जसं सांगतोय तसं कर. आपण माझ्या शर्टबद्दल बोलूया.

त्यावेळी सौरभ गांगुली हा बाथरूममध्ये गेला होता. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा सेहवाग आणि सचिनच्यामध्ये काहीतरी बोलणे चालू होते. सेहवाग सचिनला म्हणत होता की तुझा शर्ट खुप मस्त आहे रे. क्वालिटीसुद्धा मस्त आहे.

कपडाही खूप भारी आहे. तेव्हा सचिन म्हणाला की, अरे हा खास शर्ट मी कंपनीला खास माझ्यासाठी बनवायला सांगितला होता. त्यांनी माझ्यासाठी हा खास आणि महागडा शर्ट बनवला आहे. त्यांना मी बोललो होतो की माझ्यासाठी एकदम खास शर्ट हवा.

हे सौरभने ऐकले आणि योगायोग असा होता की त्या तिघांचे एकाच कंपनीसोबत शर्टाचे कॉन्ट्रॅक्ट होते. त्यानंतर सचिनला भारतातून त्या शर्टाच्या कंपनीकडून फोन यायला लागले की तू सौरभला काय सांगितले, तो आम्हाला म्हणत आहे की मला सचिनसारखाच शर्ट हवा आहे.

त्याने त्या कंपनीकडे सचिनसारखाच शर्ट हवा असल्याचा हट्ट धरला होता आणि हा सगळा सचिनचा प्लॅन होता सौरभची फजिती करण्याचा. हे तिघेही त्यावेळी खूप खोडकर होते. असे बरेच किस्से सचिनने यावेळी सांगितले आहेत.

सचिन असेही म्हणाला की आताच्या भारतीय संघातही अनेक खोडकर खेळाडू भरले आहेत. आमच्यावेळी आम्ही खुप मस्ती करायचो असे सचिन म्हणाला. तुम्हाला हे किस्से कसे वाटले आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
न्यूझीलंडच्या ख्रिस केर्न्सला सचिन – द्रविडने बनवले होते उल्लू; स्वत: सचिननेच सांगीतला भन्नाट किस्सा..
एलआयसीमध्ये काम करणारी मुलगी कशी झाली ठाकरे घराण्याची सुन? वाचा भन्नाट लव्हस्टोरी
एक कोटी झाडांपासून ऑक्सिजन मिळवून देणारा ट्री मॅन, पुर्ण जग त्यांना ठोकतंय सलाम
मराठी कलाकार पैसेच नाही तर रक्त पण देताय, त्यांना ट्रोल करु नका; सिद्धार्थ जाधवची चाहत्यांना विनंती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.