सचिन तेंडूलकरला टाकली एक ओव्हर अन् त्या बॉलरचे अख्खे करियर झाले उध्वस्त; पहा व्हिडिओ

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून फक्त भारतात नाही, तर जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. सध्या जरी तो निवृत्त असला, तरी त्याने अनेक अशा खेळी केल्या आहेत, ज्या लोकांना अजून पण बघायला आवडतात.

भारतीय क्रिकेट इतिहासात असे काही क्षण आहे, जे क्रिकेटप्रेमी कधीच विसरु शकत नाही. मग ती शारजाहमधला कप असो वा २०११ चा वर्ल्ड कप असे अनेक क्षण चाहते विसरले नाहीये. अशीच एक मालिका १९९७ मध्ये झाली होती.

१४ मे १९९७ मध्ये अशीच एक लढत पेप्सी इंडिपेंडेंस कपमध्ये झाली होती. त्या दिवशी भारत विरुद्ध न्युझिलंड असा सामना भरला होता. या सामन्यात सचिनने एक बॉलरची अशी धुलाई केली होती की त्यानंतर तो पुन्हा कधीच आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसून आला नाही.

या सामन्यात नुझिलंडने फलंदाजी करत भारतापुढे २२१ धावांचे लक्ष ठेवले होते. त्यानंतर जेव्हा सचिन खेळायला मैदानात उतरला तेव्हा त्याने बॉलर हीथ डेव्हिसची खुप धुलाई केली होती.

कदाचित त्याच कारणामुळे ती डेव्हिसची अखेरची मॅच ठरली आणि तो पुन्हा कधीच आंतरराष्ट्रीय सामन्यात दिसून आला नाही. त्याने त्याच्या कारकिर्दीत ५ कसोटी आणि ११ वनडे सामने खेळले आहे.

बेंगलोरमध्ये झालेल्या या सामन्यात एका ओव्हरमध्ये सचिनने डेव्हिसला ३ चौकार आणि १ षटकार मारला होता. ५ ओव्हरमध्ये त्याने ५४ धावा दिल्या होत्या तर चार वाईड आणि चार नो बॉल टाकले होते. सध्या सचिनने केलेल्या धुलाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांमागील खरी कारणं आली समोर; कारणं वाचून तुम्हाला बसेल धक्का
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन
खऱ्या आयुष्यात पण सलमान आहे हिरो; कॅन्सर रुग्णाची आणि सलमानची ही गोष्ट ऐकून तुम्ही व्हाल भावूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.