..आणि मास्टर ब्लास्टर सचिनच्या त्या कृतीने डॉक्टरही दचकले, पहा व्हायरल व्हिडीओ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सोशल मिडीयावर नेहमी ऍक्टव्ह असतो. त्याच्या व्हिडीओज आणि फोटोजला चाहते खुप पसंत करतात. त्यामुळे तो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

नेहमी आपल्या धडाकेबाज फलंदाजीने गोलंदाजांची हवा टाईट करणाऱ्या सचिनने यावेळेस डॉक्टरांनाच घाबरवले. सध्या सचिनचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे. सध्या रायपूर येथे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धा सुरू आहे.

त्यामध्ये सचिनही खेळत आहे. भारतीय लिजंड संघाची कमान त्याच्या हातात आहे. पहिल्याच सामन्यात वीरेंद्र सेहवागने भारतीय लिजंडला विजय मिळवून दिला आहे. आज इंग्लंडविरूद्ध दुसरा सामना रंगणार आहे.

त्यामुळे सामन्याच्या आधी सर्व खेळाडूंची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यावेळी सचिनने वैद्यकीय कर्मचाऱ्यासोबत गंमत केली. सचिनची रिऍक्शन पाहून काही वेळ डॉक्टरही घाबरले होते.

परंतु काही वेळानंतर सगळेजण हसायला लागल्यानंतर तो रिलॅक्स झाला. सचिनने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याने पोस्ट करताना लिहीले आहे की, मी २०० वा कसोटी सामना खेळत आहे आणि ही माझी २७७ वी कोरोनाची चाचणी आहे.

वातावरण निवांत करण्यासाठी एक प्रॅंक तर नक्कीच बघतो. आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सलाम, अशा आशयाचे कॅप्शन त्यांने व्हिडीओला दिले आहे. दरम्यान, आजचा सामना कोण जिंकेल याच्यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.