सचिन तेंडूलकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचला शिवतिर्थवर, पहा भेटीचा व्हिडीओ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच आपल्या नवीन घरी म्हणजे शिवतीर्थ येथे राहण्यास गेले आहेत. राज ठाकरे तेथे राहायला गेले आणि आतापर्यंत अनेक मान्यवरांनी त्यांच्या नवीन घराला पाहण्यासाठी भेट दिली आहे. त्यांचे नवीन घर पाहण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.

आता क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडूलकरलाही हा मोह आवरला नाही आणि तो राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतिर्थवर पोहोचला आहे. दोघांमध्ये खुप वेळ गप्पा झाल्या. त्यांच्या भेटीचा एक व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. दोघेही घराच्या गॅलरीमध्ये उभे होते तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

राज ठाकरेंच्या घराबाहेर सचिनला पाहण्यासाठी लोकांनी खुप गर्दी केली होती. तेव्हा लोकांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. राज ठाकरेंचे आधीचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजच्या शेजारीच शिवतिर्थ हे त्यांचे नवीन निवासस्थान बांधण्यात आले आहे.

राज ठाकरेंनी या नवीन घरात ६ नोव्हेंबरला गृहप्रवेश केला होता. त्या दिवशी दिवाळी आणि भाऊबीज होती. या नवीन घराला आतापर्यंत अनेक नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनीही राज ठाकरेंच्या नवीन घराला भेट दिली होती. त्यांचे हे नवीन घर पाच मजली आहे.

येथे सर्व सुखसुविधा असणार आहेत. शिवतीर्थ असे त्यांच्या नवीन घराला नाव ठेवण्यात आले आहे. या पाच मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच याच इमारतीत मनसेचे मुख्य कार्यालयही बांधण्यात येणार आहे.

याच ठिकाणी राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. इतर मजल्यांवर त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. या इमारतीत सर्व सोयीसुविधायुक्त असे भव्य ग्रंथालयही उभारण्यात येणार आहे. आतापर्यंत अनेकांनी या घराला भेट दिली आहे.

महत्वाच्या बातम्या
सुधीर चौधरींना युएईच्या प्रिंसेस म्हणाली आतंकवादी, अबु धाबीच्या कार्यक्रमातून केली हकालपट्टी
निकाहाचे फोटो पोस्ट करणाऱ्या मलिकांना वानखेडेंचे सडेतोड प्रत्यूत्तर; केले असे काही की…
एकाच सामन्यात रोहीतने मोडले विराटचे अनेक विश्वविक्रम, भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं
एका वर्षात १ हजार टक्क्यांनी वाढली टाटांच्या ‘या’ शेअरची किंमत, ६ महिन्यात १ लाखांचे झाले ६.३६ लाख

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.