न्यूझीलंडच्या ख्रिस केर्न्सला सचिन – द्रविडने बनवले होते उल्लू; स्वत: सचिननेच सांगीतला भन्नाट किस्सा..

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सगळ्यांना माहिती आहे. अनेक लोक या कार्यक्रमाचे चाहते आहेत. अनेक मोठे कलाकार, सेलिब्रिटी, खेळाडू, राजकारणी या कार्यक्रमात येत असतात. एकदा क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर या कार्यक्रमात आला होता.

तेव्हा डॉ. निलेश साबळेने सचिनला क्रिकेटमधील काही भन्नाट किस्से विचारले. तेव्हा राहुल द्रविडसोबतचा किस्सा सचिनने चला हवा येऊ द्या मध्ये सांगितला. तेव्हा न्यूझिलंडसोबत सामना चालू होता. हा सामना मोहालीमध्ये चालू होता.

सचिन आणि राहुल द्रविड हे दोघे फलंदाजी करत होते. भारतीय टीमची अवस्था बिकट होती. एका चांगल्या भागिदारीची गरज भारतीय संघाला होती. तेव्हा क्रिस नावाचा बॉलर सचिनला आणि राहूलला खुप त्रास देत होता.

बॉल रिव्हर्स स्वींग होत होता. दर ओव्हरला एखादा बॉल त्याचा असा यायचा की तो दोघांनाही कळत नव्हता की कोणत्या दिशेला वळत आहे. ज्यावेळी बॉल रिव्हर्स स्वींग होतो तेव्हा तुमचे लक्ष बॉलरच्या हाताकडे असते त्यावरून कळते की बॉल कोणत्या दिशेला वळणार आहे.

कारण बॉल आपोआप तिकडेच जायला लागतो. तेव्हा सचिन राहुलला म्हणाला की मी बॅट त्या हातात पकडतो जिकडे बॉल वळणार आहे किंवा स्विंग होणार आहे. डाव्या बाजूला होणार असेल तर मी डाव्या बाजूला बॅट पकडेल आणि जर उजव्या बाजूला होणार असेल तर उजव्या हातात बॅट पकडेल असे ठरले होते.

त्यामुळे राहुलला खेळायच्या आधी कळत होते की बॉल कोणत्या दिशेला जाणार आहे. असे करून दोघांनी क्रिसच्या दर ओव्हरला २-३ चौकार मारायला सुरूवात केली. क्रिसला कळेनासे झाले की अचानक या दोघांना काय झाले की इतके जोरात खेळायला लागले.

त्याचा मुड ऑफ झाला होता. तो विचार करायला लागला की इथे काहीतरी गडबड आहे. या दोघांचे काहीतरी चालू आहे असे त्याला वाटले. त्याने बघितले की हे दोघे बॅट इकडे तिकडे करत आहेत. त्याला वाटले काहीतर झोल आहे. आता त्याचे लक्ष सचिनकडेच होते.

गोलंदाजी करताना तो नेहमी सचिनकडे बघायचा. नंतर क्रिसने एक बॉल आडवा पकडला आणि राहुलला टाकला. समोर काय झालं याचं त्याला काहीच पडले नव्हते त्याने थेट सचिनकडे पाहिले आणि त्याने विचारले की ह्या बॉलवर आता तुझ्याकडे काय उत्तर आहे?

सचिनला आधीच माहिती होतं की अशाही गोष्टी होणार म्हणून त्याने राहूलला आधीच सांगितलं होतं की जर मला बॉल समजला नाही तर मी दोन्ही पायांच्या मध्ये बॅट पकडणार. त्यामुळे राहुलने सावधगिरीने तो बॉल खेळला, असे सचिन म्हणाला.

असे अनेक भन्नाट किस्से सचिनने यावेळी सांगितले. सचिन असेही म्हणाला की आताच्या भारतीय संघातही अनेक खोडकर खेळाडू भरले आहेत. आमच्यावेळी आम्ही खुप मस्ती करायचो असे सचिन म्हणाला. तुम्हाला हे किस्से कसे वाटले आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
एलआयसीमध्ये काम करणारी मुलगी कशी झाली ठाकरे घराण्याची सुन? वाचा भन्नाट लव्हस्टोरी
आकाशातून पडलेल्या दगडानं कोट्याधीश झाला मेंढपाळ, पण मोठं मन करत दान केला तो कोट्यावधीचा दगड
“तेव्हा सलमान म्हणाला, तुला कुठलीही मदत लागली तर मला सांग मग डॉक्टर असो वा पैसे मी देईल”
एक कोटी झाडांपासून ऑक्सिजन मिळवून देणारा ट्री मॅन, पुर्ण जग त्यांना ठोकतंय सलाम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.