Share

सचिन तेंडुलकरचा मुलाला खास सल्ला; म्हणाला, ‘अर्जुन मेहनतीचे परिणाम कधी ना कधी समोर येतील’

भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा(Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरला आयपीलच्या यंदाच्या हंगामात पदार्पणाची संधी मिळाली नाही. आता आयपीलमधील मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. यामुळे अर्जुन तेंडुलकरचे मनोबल वाढवण्यासाठी सचिन तेंडुलकरने त्याला एक खास सल्ला दिला आहे.(sachin tendulkar give special advice to son arjun tendulkar)

एका युट्युब शो मध्ये सचिन तेंडुलकर म्हणाला की, “मी अर्जुनला नेहमीच सांगत असतो की हा रस्ता त्याच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. त्यासाठी त्याला सतत मेहनत करावी लागेल. कधी ना कधी या मेहनतीचे परिणाम नक्कीच समोर येतील”, असे माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने सांगितले आहे. सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्स संघाशी संबंधित आहे.

पण मुंबई इंडियन्स संघाच्या निवड प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत नसल्याचे सचिन तेंडुलकरने सांगितले आहे. “मी स्वत: कधीही संघ निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही. मी या सर्व गोष्टी संघ व्यवस्थापनावर सोडून देतो. कारण मी नेहमी असेच काम केले आहे”, असे सचिन तेंडुलकरने त्या युट्युब शो मध्ये सांगितले आहे.

२०२१ मध्ये लिलावात मुंबई इंडियन्स संघाने ३० लाख रुपयांत अर्जुन तेंडुलकरला संघात सामील करून घेतले होते. दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये बरेच बदल केले पण अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली नाही. यावेळी अर्जुन तेंडुलकर सीमारेषेजवळ खेळाडूंना मदत करताना दिसला.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मैदानात बॅट आणि पाणी आणून देत होता. यावेळी अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरने त्याचे काही फोटो काढले होते. हे फोटो सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून शेअर केले होते. यासोबत सारा तेंडुलकरने ‘गली बॉय’ चित्रपटातील अपना टाइम आएगा हे गाणे देखील शेअर केले होते.

या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघाने २२ नवोदित खेळाडूंना संधी दिली पण अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली नाही. अर्जुनचा गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश करण्यात आला होता, पण अद्याप त्याला एकही सामना खेळायला मिळालेला नाही. आता आयपीलच्या पुढील हंगामात अर्जुन तेंडुलकरला संधी मिळते का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘त्याची तंगडी तोडल्याशिवाय राहणार नाही’; राज ठाकरेंना नडणाऱ्या ब्रिजभुषणसिंगला मनसेची जाहीर धमकी
मुंबईत हेल्मेटसक्ती! दुचाकी चालकासह पाठीमागच्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक, नाहीतर होणार ‘एवढा’ दंड
काॅंग्रेसचे बडे नेते कपिल सिब्बल यांनी दिला पक्षाचा राजीनामा; आता जाणार ‘या’ पक्षात

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now