Share

Sachin Tendulkar : ऑपरेशन सिंदूरनंतर सचिन तेंडुलकरने फक्त दोन वाक्यांतच जगासमोर काढली पाकिस्तानची लाज

Sachin Tendulkar : 8 मे 2025 — काश्मीरच्या पहलगाममध्ये 26 निष्पाप पर्यटकांच्या हत्येने भारतभरात संताप उसळला आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत जोरदार हवाई कारवाई केली. भारताने अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानातील 9 ठिकाणी दहशतवादी तळ बेचिराख करत 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

ही कारवाई फक्त लष्करी नव्हती, तर संपूर्ण देशाच्या अस्मितेचं उत्तर होतं. त्यानंतर भारतभरातून या कारवाईचं स्वागत होत असताना, देशाच्या मानाच्या शिखरावर असलेल्या भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही आपली ठाम भूमिका मांडली. भारतीय हवाई दलाचा सन्माननीय ग्रुप कॅप्टन असलेल्या सचिनने फक्त दोन वाक्यांत पाकिस्तानला सडेतोड इशारा दिला.

सचिन तेंडुलकरचं जोरदार ट्वीट

सचिन तेंडुलकरने(Sachin Tendulkar) ट्विटरवर लिहिलं —
“एकतेत निर्भयता आहे आणि अमर्यादित शक्ती. भारताची ढाल म्हणजे त्याचे लोक. या जगात दहशतवादाला स्थान नाही. आम्ही सर्व एक संघ आहोत! जय हिंद. #OperationSindoor”

त्याच्या या वक्तव्याने संपूर्ण देशाच्या भावना व्यक्त केल्या. सचिनने नेहमीच मैदानात शांत संयमी शैली जपलेली असली, तरी राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर त्याची भूमिका कायम स्पष्ट आणि ठाम असते.

दहशतवाद्यांना दिलं चोख प्रत्युत्तर

पहलगाममध्ये धार्मिक ओळख विचारून पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या पाकपुरस्कृत दहशतवाद्यांना भारताने थेट त्यांच्या भूमीत घुसून संपवले. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला जागतिक स्तरावर तोंड द्यावं लागेल, याची सुरुवात या कारवाईतून झाली आहे.

भारताची ही कारवाई अचूक नियोजन, उच्च दर्जाचं गुप्तचर नेटवर्क आणि अत्याधुनिक हवाई ताकदीचं उत्तम उदाहरण ठरली. पाकिस्तानातील नागरिकांना इजा न करता, फक्त दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या लष्करी नीतीचा आदर्श जागतिक व्यासपीठावर ठरतोय.

देशभरात उत्साहाचे वातावरण

भारतीय लष्कराच्या या शौर्यगाथेमुळे देशभरात उत्साहाचं आणि गर्वाचं वातावरण आहे. सामान्य नागरिकांपासून ते खेळाडूंनी, कलाकारांनी, राजकारण्यांनी या कारवाईचं जोरदार समर्थन केलं. सोशल मीडियावर #OperationSindoor हा ट्रेंड अव्वल स्थानी असून, ‘जय हिंद’ च्या घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येत आहेत.

पाकिस्तानची धांदल सुरू

भारताच्या हवाई कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांचे मृतदेह उचलण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागतेय, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दबाव वाढतोय. भारताने केलेल्या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे की, देशाच्या सुरक्षेवर आघात करणाऱ्यांना माफ नाही.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने उचललेलं हे कडक पाऊल हे केवळ एक लष्करी कारवाई नव्हे, तर राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक ठरलं आहे. सचिन तेंडुलकरसारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाने घेतलेली ठाम भूमिका ही देशासाठी एकजुटीचं आणि शौर्याचं प्रतिक आहे.

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now