क्रिकेटचा देव पावला! मिशन ऑक्सिजनसाठी सचिन तेंडूलकरने केली १ कोटी रुपयांची मदत

मुंंबई | देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लस, ऑक्सिजन, बेड यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे.

देशात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा तडफडून मृत्यू होत आहे. देशावर आलेल्या संकटात मदतीसाठी नेते, अभिनेते, खेळाडू, उद्योजक पुढे सरसावले आहेत. देशातून  तर भारताला मदत  होत आहे. पण देशाबाहेरूनही भारताच्या मदतीला धावत आहेत.

भारताचा माजी खेळाडू क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरही आता मदतीसाठी पुढे आला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजन इंडियाला १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मिशन ऑक्सिजन या मोहिमेअंतर्गत देशातील हॉस्पीटल्सना देणगी आणि ऑक्सिजन सिलेंडर दान केली जाणार आहेत.

मिशन ऑक्सिजन ही मोहिम २५० पेक्षा जास्त युवा उद्योजकांनी सुरू केली आहे. सचिनने ट्विट करत यामध्ये मदत केली असल्याचं सांगितलं आहे. मात्र यामध्ये त्याने १ कोटी मदत केली असल्याचा उल्लेख केला नाही. इंग्रजी प्रसारमाध्यमांच्या माहितीनूसार त्याने १ कोटी मदत केली असल्याचं बोललं जात आहे.

भारताचे खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना यांनीही कोरोना काळात मदत केली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ब्रेट ली याने ऑक्सिजन खरेदीसाठी ४३ लाखांची मदत केली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा पॅट कमिन्सने ३७ लाख ३६ हजारांची मदत केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
“२४ तासात भाजपाकडून मला व माझ्या परिवाराला बलात्कार आणि खुनाच्या धमकीचे ५०० फोन”
देश छोटा असला तरी ह्रदय मात्र मोठं! ‘या’ छोट्याश्या देशाने भारताला पाठवले २०० ऑक्सिजन कंसंट्रेटर्स
कलेक्टरसाहेब डिसेंबरमध्येच लागले होते तयारीला; आता ना ऑक्सिजनची कमी ना बेडची

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.