सचिन तेंडूलकरची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रूग्णालयात दाखल

 

काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झालेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सचिनला २७ मार्चला कोरोनाची लागण झाली होती, आता परिस्थिती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल झालो आहे. प्रकृती सुधरल्यानंतर लवकरच मी घरी परत येईल. माझ्यासाठी लोकांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद, असे ट्विट करता सचिन तेंडुलकरने माहिती दिली आहे.

२७ मार्चला कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्याने स्वतःला होम क्वारंटाईन केले होते. तसेच घरातील बाकीचे सर्व जण निगेटिव्ह असल्याची माहिती सुद्धा त्याने दिली होती, आता मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सचिन वर्ल्ड रोल्ड सेफ्टी टी २० सिरीजमध्ये खेळत होता. सचिन पॉझिटिव्ह आल्यानंतर या खेळात खेळणारे तीन खेळाडूंना सुद्धा कोरोनाचा लागण झाली होती. त्यामध्ये युसूफ पठाण, एस बद्रीनाथ आणि इरफान पठाण या खेळाडूंचे नाव होते, हे तिन्ही खेळाडू सध्या होम क्वारंटाईन आहे.

या सिरीजमध्ये सचिन इंडिया लिजेन्ड्सचा कर्णधार होता, तसेच त्याने या सिरीजची ट्रॉफी पण भारताला जिंकून दिली होती. या सिरीजमध्ये सर्वात जास्त रन बनवणारा फलंदाज सचिन होता.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.