“सेलिब्रिटींवर दबाव आणून ट्विट करण्यास भाग पाडल्याचे भाजपाचे षडयंत्र उघड”

मुंबई | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केल्यानंतर लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यासह काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी या सेलिब्रिटींच्या विरोध ट्विट केले होते. देशात फूट पाडण्याचा प्रयत्न होत कुणी करु नये अशा आशयाचे हे ट्विट होते.

मात्र आता या ट्विटसाठी भाजपनेच या सेलिब्रिटींवर दबाव टाकला होता, हे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ‘भाजपाने सेलिब्रिटींवर दबाव आणून शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट करण्यास भाग पाडले हा काँग्रेसचा आरोप सत्य होता हे सिद्ध झाले असून पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत भाजपाच्या आयटी सेल व १२ व्यक्तींचा हात होता हे समोर आले आहे.’

तसेच या भाजपाने देशविरोधी केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला असून भाजपा आयटी सेल व १२ जणांवर तात्काळ कारवाई करा” अशी मागणी कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, सदर प्रकरणात भाजपाचा कुटील चेहरा लपला जावा याकरता भाजपाचे नेते देशासाठी आदरणीय अशा भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडूलकर यांच्या मागे लपून महाराष्ट्र सरकार या भारतरत्नांची चौकशी करणार असा खोटा कांगावा करत होते, असेही सावंत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनी वीजबिले भरलीच पाहिजेत; अजित पवारांनी स्पष्ट शब्दात खडसावले
रिहानाचा टॉपलेस फोटो आणि गळ्यातील पेंडेंट पाहून राम कदम संतापले, म्हणाले…
मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार? मोहन भागवतांनी घेतली मिथुन चक्रवर्ती यांची भेट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.