“परमबीर सिहांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या भाजपला आज त्यांचाच पुळका का येतोय?”

मुंबई : भाजपा नेत्यांकडून मागील काही दिवसात करण्यात आलेल्या आरोपांवरून काँग्रेसनं पुन्हा एकदा पलटवार केला आहे.

एपीआय असलेले सचिन वाझे गृहमंत्र्यांविरोधात थेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली. यावरून वाझे हे नेमके कुणाच्या जवळचे होते हे सिद्ध होते, असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हंटले आहे.

याबाबत ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘एनआयए सिंग यांची चौकशी का करत नाही? सिंग यांची चौकशी का टाळण्यात येत आहे? सिंग यांची अटक टाळण्यात येत आहे का? अँटालिया प्रकरण घडण्यापूर्वी वाझेंना नेमकं कोण भेटतं होतं, त्याचा तपास व्हावा.’

तसेच भाजपाने रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा आणि फोन टॅपिंग प्रकरणाचा हवाला देत राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

यावरून देखील सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपाने आतापर्यंत जे आरोप केले, ते निराधार होते. या प्रकरणाशी राज्य सरकारला जोडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

रश्मी शुक्लांनी ७ महिन्यांपूर्वी फोन टॅपिंग केलं होतं. तर मग, रश्मी यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावर भाजप मागील ५-६ महिन्यांपूर्वी गप्प का होतं? गिरे तो भी टांग उपर, अशी फडणवीसांची भूमिका आहे. परमबीर सिंग यांची चौकशी टाळण्यासाठी भाजपने प्रयत्न केले का? असाही सवाल सावंत यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या 

उंदीरमामा लई भारी! या उंदीराने वाचवला आहे हजारो लोकांचा जीव, वाचा कसा

नाद खुळा! ऊसाची शेती करता करता सुचली भन्नाट आयडिया, आता कमवतोय लाखो रुपये

लक्षात ठेवा! ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.