महिला अत्याचारांचे सर्वात जास्त प्रकरण भाजपशासित राज्यांमध्येच; काँग्रेसने आकडेवारी सादर करत भाजपचे केले तोंड बंद

मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी भाजप नेते ठाकरे सरकारकडे करताना दिसून येत आहे. अशातच राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर भाजप मुख्यमंत्र्यावर आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. अशातच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपशासित राज्यांमध्ये झालेल्या महिला अत्याचारांची आकडेवारीच सादर केली आहे.

महिला अत्याचारांमध्ये भाजपशासित उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचे आत्ताच घोषित करण्यात आलेल्या एनसीआरबी २०२० च्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे. तर महाविकास आघाडीच्या काळात महिला अत्याचारांमध्ये घट झाली असल्याचे दिसत आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

त्यामुळे भाजपच्या राज्यांमधील महिला अत्याचारांवरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा द्यावा, असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

महिला अत्याचारांमध्ये भाजपशासित प्रदेश पुन्हा आघाडीवर असून आसाम, मध्य प्रदेश, हरियाणा, कर्नाटक या भाजपशासित राज्यांमध्येही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

तसेच आसाममध्ये सर्वाधिक प्रतिलक्ष १५४ महिलांवर अत्याचार झाले आहे. सामूहिक बलात्कार, खूनाच्या घटनांमध्ये उत्तर प्रदेश पुढे आहे. त्यानंतर भाजपशासित मध्य प्रदेश व आसाम येतात, असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे. यासंबंधी सचिन सावंत यांनी ट्विटरवर आकडेवारीही शेअर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीतील मुलाने केला पोलंडमधील पुरूषाशी समलैंगिक विवाह, वाचा त्यांची अजब गजब प्रेमकहाणी
मुलं जन्माला घालण्यात मुस्लिम एक नंबरवर; अहवालातून धक्कादायक खुलासे आले बाहेर
बिग ब्रेकींग! आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, आयपीएल स्थगित होण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.