“२०१८ साली देवेंद्र फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले”

दिल्ली | इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आज मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. मुंबईच्या राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली.

२०१८ मध्ये अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती आणि त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचे नाव होते. या अटकेनंतर राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. यावेळी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरणात पुरावे नसताना चौकशी होते इथे तर सुसाईड नोट आहे. तसेच हे सर्व खाजगी गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. २०१८ साली देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले. असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधी पक्षात असताना आम्ही हे सर्व बघितले आहे. त्यावेळी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. गेली दोन वर्षे हा परिवार प्रचंड दहशतीत होता.

दोन वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. अन्वय यांना ही एक प्रकारची श्रद्धांजली आहे. असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपकडून देशात ठिकठिकाणी आंदोलने आणि निषेध होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.