‘तो’ फडणवीस सरकारचाच प्लान होता; कॉंग्रेसने दिले सगळे पुरावे

मुंबई |  मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला. त्यानंतर राज्य सरकारने प्रस्तावित केलेली जागा केंद्राची असल्याचे पत्रच केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आलं. त्यानंतर भाजपा विरोधात महाविकास आघाडी सरकार असा जोरदार सामना पाहण्यास मिळतो आहे.

याचाच धागा पकडत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. केंद्र सरकारने मेट्रो कारशेडबाबत राज्याला पत्र पाठवण्यामागे हीन राजकारण आहे. त्या जागेवर १९६९ पासून राज्य सरकारचा अधिकार आहे. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच आता केंद्र सरकार या जागेवर आपला दावा सांगत असल्याचे सावंत म्हणाले.

याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, ‘तत्कालीन फडणवीस सरकारने मागची पाच वर्षे मुंबईकरांची फसवणूक केली. मुंबई मेट्रो प्रकल्पाभोवती मागची पाच वर्षे भाजपाने राजकारण केलं आणि मुंबईकरांना फसवलं असा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. ते याबाबत पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, याबाबत पुढे बोलताना सावंत म्हणाले, ‘राज्य सरकारने मेट्रो ३ आणि ६ ची कारशेड कांजूरला उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा आराखडा फडणवीस मुख्यमंत्री असतानाच आखण्यात आला असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे.

‘मेट्रो ३ ची कारशेड कांजूर मार्गलाच असली पाहिजे हे फडणवीस सरकारचेच मत होते आणि आज महाविकास आघाडी सरकारने जे पाऊल उचलले आहे, तो प्लान फडणवीस सरकारचाच होता, असे सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, ‘अश्विनी भिडे यांचे २२-०९-२०१५ रोजीचे मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी यांना मेट्रो कारडेपो व अन्य कामांसाठी कांजूर येथे जागेची मागणी करण्यासाठी पत्र लिहिले होते, ज्यामध्ये मेट्रो ३ करिता कांजूरमार्ग येथील जागा अत्यंत उपयुक्त असून त्या जागेशिवाय प्रकल्प पूर्ण होऊच शकणार नाही,’ असे म्हटल्याचेही सावंत यांनी सांगितले.

 

महत्त्वाच्या बातम्या
कोरोनामुळे दिवाळीत चालणारे व्यवसाय ठप्प; व्यावसायिक हवालदिल

पेन्शनधारकांना बँकेत जाण्याची गरज नाही! ऑनलाइन पद्धतीने जमा करा जीवन प्रमाणपत्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.