‘पंपावर मोदींचा आधी हसरा फोटो, नंतर मास्क, आता वाटतं मोदींच्या डोळ्यांवर पट्टी बांधावी’

मुंबई : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून कॉंग्रेसने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. या इंधन दरवाढीवरुन विरोधकांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. पेट्रोलचे दर वाढत चालले आहेत. त्याकडे केंद्र सरकार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

याचबरोबर तुम्ही देशातील पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहिला असेल. केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेची ती जाहिरात आहे. त्यावरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

सावंत म्हणतात, ‘प्रत्येक पेट्रोल पंपावर पंतप्रधान मोदींचा फोटो आहे. त्या फोटोमध्ये ते आधी हसायचे. मग मास्क घातला. आता वाटतं की त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधावी. कारण त्यांना ही लूट दिसत नाही’, अशा शब्दात सावंत यांनी इंधन दरवाढीवरुन मोदींना लक्ष केले आहे.

इंधन दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
राहुल गांधी यांनी ट्वीटरवरून टीका केली आहे. “वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं।” असं म्हणत राहुल यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. तसेच “जून २०१४ मध्ये भाजपचं सरकार आलं, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती ९३ डॉलर प्रतिबॅरल होत्या.

तेव्हा पेट्रोल ७१ तर डिझेल ५७ रुपये प्रतिलिटर होतं. गेल्या ७ वर्षांत कच्चं तेल ३० डॉलरने स्वस्त झालं. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करत आहे आणि डिझेल त्याच्या पाठोपाठ जात आहे” असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पठठयाने यूट्युबवरून प्रशिक्षण घेऊन घरातूनच सुरू केली बनावट नोटांची छपाई; वाचा संपूर्ण प्रकरण
रोहित पवारांच्या नगरच्या सभेची महाराष्ट्रभर चर्चा का? वाचा सविस्तर
प्रेग्नेंसीनंतर सपना चौधरीने धरला ताल; सोशल मिडीयावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.